Sachin Tendulkar ASK Me Anything Session : सचिन तेंडुलकर हे फक्त नाव नाही तर तो क्रिकेट जगतातील एक ब्रँड आहे. हा चेहरा सोशल मीडियावरील लोकप्रिय माध्यम ठरत असलेल्या रेडिट प्लॅटफॉर्मचा चेहरा झालाय. रेडिटनं सचिनला ब्रँड अँबेसिडर केलं आहे. याच पार्श्वभूमीवर मास्टर ब्लास्टरनं सोशल मीडियावरील या माध्यमातून ASK Me Anything सेशनसह आपल्या चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी एका चाहत्याला खरंच आपण सचिनशी बोलतोय का? असा प्रश्न पडला. याचं उत्तर देताना क्रिकेटच्या देवानं थेट आधार कार्डचा मुद्दा छेडला अन् हा मुद्दा चांगलाच चर्चेत आला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
आपण खरंच सचिन तेंडुलकरशी गप्पा मारतोय का? चाहत्याचा प्रश्न अन्...
क्रिकेटमधील दिग्गजानं सेशन सुरु केल्यावर चाहत्यांच्या प्रत्येक प्रश्नाच अगदी प्रामाणिक उत्तर दिले. पण एका चाहत्याला या सेशनच्या माध्यमातून जी व्यक्ती चॅट करतीये ती सचिन तेंडुलकरच आहे का? असा प्रश्न पडला. त्याने सचिनला व्हाइस नोटच्या माध्यमातून याची खात्री करून घेण्याचा प्रयत्न केला. यावर सचिन तेंडुलकरनं लगेच स्कीनवर विचारलेल्या प्रश्नासह फोटो शेअर केला. अन् रेडिटवर ऑनलाइन असणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून सचिन तेंडुलकरच आहे ते स्पष्ट झाले. पण तेंडुलकरला इथं गमत सुचली.
वर्ल्डकप २०११ फायनल सामन्यात धोनी फलंदाजीसाठी वर का आला? सचिननं सांगितली अंदर की बात!
आधार कार्ड दाखवू का?
सचिन तेंडुलकर हा शांत स्वभावानं ओळखला जातो. पण ज्यावेळी एखाद्याची गंमत करायची संधी मिळते, त्यावेळी तो मजेशीर अंदाजात एखाद्याची फिरकीही घेताना पाहायला मिळाले आहे. ड्रेसिंग रुमसह मैदानातील असे अनेक किस्से आहेत, ज्यावेळी त्याने आपल्या सहकऱ्यांची गंमत केली आहे. फोटोवरून ओळक पक्की झाल्याची खात्री करून घेण्यासाठी मग सचिननं चाहत्याची फिरकी घेतली. आधार कार्ड पाठवू का? असा मजेशीर प्रश्न सचिनने विचारला. ही गोष्ट चांगलीच चर्चेत आहे.
चाहत्याला हा प्रश्न पडण्यामागचं कारण?
काही दिवसांपूर्वीच भारताचा माजी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याने सोशल मीडियाच्या माध्यमातून फसवणूक कशी केली जाते, यासंदर्भातील आपल्याला आलेला अनुभव शेअर केला होता. IPL मध्ये खेळणाऱ्या परदेशी खेळाडूच्या नावाने अश्विनकडे एका नेटकऱ्याने विराट कोहलीचा मोबाईल नंबर मागितला होता. अश्विनने नंबर शेअर केला होता. हा किस्सा चांगलाच चर्चेत होता. त्यामुळे रेडिटवर संवाद साधणारा खरंच सचिन आहे की, अन्य कोणी त्याच्या वापर करतंय? असा प्रश्न चाहत्याला पडला असावा.