Join us

राहुल द्रविड संदर्भात एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य; फुटबॉल लीगचा दाखला देत बांधला हा अंदाज

द्रविडचा राजीनामा अन् फसवा निर्णय; नेमकं काय म्हणाला एबी डिव्हिलियर्स?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 19:20 IST

Open in App

IPL च्या आगामी हंगामाआधी भारताचा माजी कर्णधार आणि वर्ल्ड चॅम्पियन कोच राहुल द्रविडनंराजस्थान रॉयल्स संघाची साथ सोडली. मोठ्या पदाची ऑफर देऊनही द्रविड संघासोबत थाबण्यास तयार झाला नाही, असे फ्रँचायझीनं त्याने पद सोडल्याची माहिती देताना सांगितले. पण यासंदर्भात आता दक्षिण आफ्रिकेच्या माजी क्रिकेटरनं मोठं वक्तव्य केलं आहे. राहुल द्रविडनं पद सोडलेले नाही तर त्याला हटवण्यात आलंय असा अंदाज त्याने बांधला आहे. यासाठी त्याने फुटबॉल लीगचा दाखला दिलाय. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

द्रविडचा राजीनामा अन् फसवा निर्णय

दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटरनं युट्युबच्या माध्यमातून राजस्थान रॉयल्सच्या संघात घडलेल्या घटनेवर भाष्य केले. फुटबॉल लीगचा दाखला देत तो म्हणाला की, ज्यावेळी संघ जिंकत नाही त्यावेळी कोच आणि मॅनेजर यांच्यावरील दबाव वाढतो. अशा वेळी बऱ्याचदा संघ मालक नवे निर्णय घेतात. त्यामुळेच मला वाटतं की, द्रविडच्या बाबतीत हेच झाल असावे. त्याला हटवण्यात आले आहे. कदाचित राजस्थान रॉयल्सच्या संघ पुढच्या हंगामासाठी नव्या बदलासह संघ बांधणीला महत्त्व देत असावा. राजस्थान रॉयल्सच्या संघाने मागच्या हंगामात जोस बटल सारखे अनेक चांगले खेळाडू रिलीज केले. एक दोन खेळाडूंना रिलीज करणं समजू शकते, पण राजस्थानच्या संघाने एकाच वेळी अनेक खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवला, हा एक फसवा निर्णय होता, असे मत एबीनं मांडले आहे.

रोहित शर्माची झाली फिटनेस टेस्ट! पास की नापास, काय आला निकाल? संघात स्थान मिळणार?

फ्रँचायझीनं खास निवेदन शेअर करत दिली होती माहिती

राजस्थान रॉयल्सच्या फ्रँचायझीच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून राहुल द्रविडच्या राजीनाम्याची गोष्ट शेअर केली होती. IPL २०२६ आधी RR संघासोबतचा द्रविडचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. संघाच्या प्रवासात द्रविडनं मोलाचा वाटा उचलला असून त्याच्या सानिध्यात नवी पिढी घडली, असा उल्लेख करत फ्रँचायझीनं सेवा दिल्याबद्दल द्रविडचं आभार मानले होते.  

२०२५ च्या हंगामात १४ पैकी फक्त ४ सामने जिंकले

राहुल द्रविड २०१२ आणि २०१३ या कालावधीत राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार होता. त्यानंतर तो मेंटॉरच्या रुपात संघासोबत जॉईन झाला. २०२५ च्या हंगामात पुन्हा एकदा त्याने संघाच्या कोचिंगची धूरा सांभाळली. या हंगामात राजस्थानच्या संघाला १४ पैकी फक्त ४ सामन्यातच विजय मिळवता आला होता. ते गुणतालिकेत नवव्या क्रमांकावर राहिले.  

 

टॅग्स :राहुल द्रविडएबी डिव्हिलियर्सराजस्थान रॉयल्सआयपीएल २०२४