पाकिस्तान क्रिकेट संघाचे मुख्य निवडकर्ता आणि माजी जलगती गोलंदाज आकिब जावेद याने सध्याच्या घडीला जगात भारी असलेल्या जसप्रीत बुमराहची आपल्या संघातील मिस्ट्री स्पिनर उस्मान तारिक याच्यासोबत तुलना केली आहे. त्याने अजब गजब तर्क देत मांडलेले मत नेटकऱ्यांना चांगलेच खटकले आहे. सोशल मीडियावर पाकिस्तानी निवडकर्त्याला ट्रोल करण्यात येत आहे. जसप्रीत बुमराह हा गत टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला. सलग दुसऱ्या हंगामात त्याने ही कामगिरी करून दाखवली. त्यामुळेच या महान गोलंदाजाची नवख्या फिरकीपटूसमोर तुलना करणं नेटकऱ्यांना खटकले असून हा मुद्दा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
जसप्रीत बुमराहची थेट पाक मिस्ट्री स्पिनरशी तुलना
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेआधी पाकिस्तानचा मिस्ट्री स्पिनर उस्मान तारिक हा त्याच्या गोलंदाजी शैलीमुळे चर्चेत राहिला. आकिब जावेद याने आपल्या या गोलंदाजाची तुलना थेट जसप्रीत बुमराहशी केली आहे. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज आणि मुख्य निवडकर्ता आकिब जावेद याने म्हटलं आहे की, जसप्रीत बुमराह हा गोलंदाजी शैली आणि वेगाच्या जोरावर फलंदाजाची लय बिघडवण्याची क्षमता असणारा गोलंदाज आहे. यामुळेच तो महान गोलंदाजांपैकी एक ठरतो. बुमराहची शैली उस्मान तारिक याच्यासारखीच वाटते. विशेषतः चेंडू टाकण्याआधी तो थांबतो, असेही त्याने म्हटले आहे.
हार्दिक पांड्या-रोहित शर्माबाबत रंगल्या अजब चर्चा, अखेर Mumbai Indiansला द्यावं लागलं उत्तर
PCB चा मुख्य निवडकर्ता नेमकं काय म्हणाला? "सध्याच्या घडीला संपूर्ण जगात अशा प्रकारचा एकच गोलंदाज आहे आणि तो म्हणजे बुमराह. बुमराह खूप वेगळा आहे. तो साधा गोलंदाज नाही. त्याची गोलंदाजी शैली खूप विचित्र आहे. तो गोलंदाजीसाठी धावत येतो तेव्हा मी नेहमी म्हणतो की, तो उस्मान तारिकसारखा आहे. तो वेगवान गोलंदाजांमधला उस्मान तारिक आहे. तो खूप वेगात चेंडू टाकतो आणि इतक्या वेगळ्या शैलीत टाकतो की, कोणत्याही फलंदाजासाठी तो घातक ठरतो.”
सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया
भारताचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह हा सध्याच्या घडीला जगातील सर्वोत्तम गोलंदाज आहे. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात सर्वोत्तम कामगिरी करुन दाखवत जगभरात आपली ओळख निर्माण करणऱ्या बुमराहची तुलना पाकिस्तानच्या नवख्या स्पिनरसोबत करणं म्हणजे वेडेपणाच आहे, अशा आशयाच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत. आकिब जावेद भारतीय चाहत्यांनी निशाण्यावर आला असून सोशल मीडियावर त्याची धुलाई सुरु आहे.
Web Summary : Pakistani selector Aaqib Javed compared Jasprit Bumrah to Usman Tariq, sparking outrage. He likened Bumrah's action to the spinner, drawing criticism. Fans trolled Javed for comparing Bumrah, a world-class bowler, with a novice spinner. The comparison is being widely debated.
Web Summary : पाकिस्तानी चयनकर्ता आकिब जावेद ने जसप्रीत बुमराह की तुलना उस्मान तारिक से की, जिससे आक्रोश फैल गया। उन्होंने बुमराह की गेंदबाजी शैली को स्पिनर के समान बताया, जिसकी आलोचना हुई। प्रशंसकों ने जावेद को विश्व स्तरीय गेंदबाज बुमराह की तुलना एक नौसिखिए स्पिनर से करने पर ट्रोल किया। इस तुलना पर व्यापक बहस हो रही है।