Vipraj Nigam Richa Purohit: उत्तर प्रदेशातील नोएडा येथील एका तरुणीने IPL स्टार, दिल्ली कॅपिटल्सचा खेळाडू विपराज निगम याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. लग्नाचे आमिष दाखवून नोएडा येथील हॉटेलमध्ये विपराजने तरुणीवर बलात्कार केल्याची तक्रार तिने केली आहे. पीडित महिला ही हैदराबादची आहे आणि दोघांमध्ये सोशल मीडिया प्लॅटफॉर्म स्नॅपचॅटद्वारे मैत्री झाली. महिला क्रिकेटपटूने नोएडा पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
नेमके प्रकरण काय?
IPL मध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळणारा क्रिकेटपटू विपराज निगम सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. त्याने रिचा पुरोहित नावाच्या महिलेवर धमकी देणारे फोन केल्याचा आणि मेसेज पाठवल्याचा आरोप केला आहे. विपराजने बाराबंकी कोतवाली नगर पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे आणि महिलेविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
सतत धमक्यांचा विपराज निगमचा आरोप
विपराजने केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, सप्टेंबर २०२५ पासून त्याला रिचा पुरोहित नावाच्या महिलेकडून धमकीचे फोन आणि मेसेज येत आहेत. जेव्हा त्याने तिचा नंबर ब्लॉक केला तेव्हा त्याच महिलेने अनेक आंतरराष्ट्रीय नंबरवरून त्याच्याशी संपर्क साधण्यास सुरुवात केली. विपराजचा आरोप आहे की, ती तरुणी सोशल मीडियावर बनावट व्हिडिओ पोस्ट करून त्यांना खोट्या प्रकरणांमध्ये अडकवण्याची आणि बदनामी करण्याची धमकी देत आहे. रिचावर कठोर कारवाई करण्याचे आवाहन त्याने पोलिसांना केले आहे.
पत्रकार तनू बालियनचा वेगळाच दावा
तनु बालियन नावाच्या पत्रकाराने रिचा पुरोहितशी बोलल्याचा दावा केला आहे. तनु बालियनचा दावा आहे की विपराजने प्रथम रिचाशी मैत्री केली, नंतर तिला लग्नाचे आमिष दाखवले आणि नंतर नोएडाच्या एका हॉटेलमध्ये तिच्याशी शारीरिक संबंध ठेवल्यानंतर तिच्यावर हल्लाही केला.