Join us

महेंद्रसिंग धोनीच्या पत्नीचा 'तो' फोटो व्हायरल; साक्षीची नेटकऱ्यांनी घेतली शाळा, वाचा सविस्तर

साक्षी धोनीची फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2024 13:21 IST

Open in App

MS Dhoni Wife Sakshi Dhoni : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीसोशल मीडियाच्या या जगात सोशल मीडियापासून दूर असतो. पण, त्याची पत्नी साक्षी धोनी सोशल मीडियावर फार सक्रिय असते. ती नेहमी नवनवीन फोटो, व्हिडीओ पोस्ट करुन चाहत्यांचे लक्ष वेधत असते. याशिवाय साक्षीच चाहत्यांना आपल्या लाडक्या माहीची झलक दाखवत असते. नेहमी प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या साक्षीचा आता एक फोटो व्हायरल होत आहे. 

साक्षी धोनीचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती सिगारेट ओढताना दिसत आहे. हा फोटो भारतातील नसून परदेशातील आहे. एका पार्टीदरम्यान काढलेल्या फोटोमध्ये साक्षी सिगारेट पेटवताना दिसत आहे. मात्र, साक्षी प्रत्यक्षात हे कृत्य करत असल्याचे स्पष्टपणे दिसत नाही. हा फक्त एक फोटो आहे, ज्यामध्ये ती सिगारेट ओढत असल्याचे दिसते. साक्षी धोनीच्या या फोटोवर चाहत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

खरे तर साक्षी धोनीने नुकतेच तिच्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती एन्जॉय करताना दिसत आहे. यावेळी बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल करिश्मा तन्नाही दिसली. साक्षीचे नाव सिगारेटच्या संदर्भात चर्चेत येण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी तिच्या कॉलेजच्या दिवसांचा एक फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. 

दरम्यान, धोनी भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वात भारताने तीनवेळा आयसीसीचा किताब जिंकला आहे. धोनी कर्णधार असताना भारताला एक ट्वेंटी-२० विश्वचषक, एक वन डे विश्वचषक आणि एक चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्यात यश आले. २०१३ मध्ये टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या रूपात आयसीसीचा किताब जिंकला होता. तेव्हापासून मोठ्या कालावधीपर्यंत टीम इंडिया आयसीसी ट्रॉफीच्या प्रतिक्षेत होती. मात्र, रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाने ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ चा किताब जिंकून तमाम भारतीयांची इच्छा पूर्ण केली. 

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीऑफ द फिल्डसोशल मीडिया