UAE ला गेलेल्या पाकिस्तानच्या खेळाडूंना सतावतेय कुटुंबियांची चिंता; सरकारकडे केली मदतीची मागणी

आशिया चषक स्पर्धा सुरू होण्यास आता अवघे काही दिवस उरले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2022 12:37 PM2022-08-24T12:37:07+5:302022-08-24T12:38:11+5:30

whatsapp join usJoin us
A Pakistani player who has traveled to the UAE for Asia Cup 2022 is worried about the flood situation in the country | UAE ला गेलेल्या पाकिस्तानच्या खेळाडूंना सतावतेय कुटुंबियांची चिंता; सरकारकडे केली मदतीची मागणी

UAE ला गेलेल्या पाकिस्तानच्या खेळाडूंना सतावतेय कुटुंबियांची चिंता; सरकारकडे केली मदतीची मागणी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : आशिया चषक (Asia Cup 2022) स्पर्धा सुरू होण्यास आता अवघे काही दिवस उरले आहेत. यूएईच्या धरतीवर पार पडणाऱ्या या स्पर्धेसाठी संघ दाखल होण्यास सुरूवात झाली आहे. मात्र पाकिस्तानच्या (Pakistan) एका खेळाडूला पुरात अडकलेल्या कुटुंबियांची चिंता सतावत आहे. त्याला आशिया चषकाची सोडून आपल्या देशवासियांची काळजी लागली असून त्याने पाकिस्तानसरकारकडे मदतीची मागणी देखील केली आहे. पुरात अडकलेल्या लोकांबाबत आवाज उठवणारा पाकिस्तानचा खेळाडू शाहनवाज दहानी (Shahnawaz Dahani) आशिया चषकातील पाकिस्तानच्या संघाचा हिस्सा आहे. 

पाकिस्तानात पुराचे संकट
पाकिस्तानी क्रिकेटरने ट्विटरवर एक फोटो शेअर करून लिहले की, "दक्षिण पंजाब, उत्तर सिंध आणि बलुचिस्तानमध्ये पुरामुळे परिस्थिती बिघडली आहे. पाऊस आणि पुरामुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे, तर अनेक जण बेघर झाले आहेत. अशा परिस्थितीत मी सरकार आणि सामाजिक संस्थांना मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन करतो." सरकार आणि NGO यांच्याशिवाय जवळपासच्या स्थानिक लोकांनी देखील एकमेकांना मदत करावी असे पाकिस्तानच्या क्रिकेटरने ट्विटच्या माध्यमातून म्हटले. 

आशिया चषकात पाकिस्तानचा पहिला सामना भारताविरूद्ध (IND vs PAK)  रविवारी 28 ऑगस्ट रोजी होणार आहे. या बहुचर्चित स्पर्धेपूर्वीच शाहिन आफ्रिदीच्या रूपात पाकिस्तानच्या संघाला झटका बसला. त्यामुळे वेगवान गोलंदाज शाहनवाज दहानीला पाकिस्तानच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. शाहनवाजने आतापर्यंत 2 एकदिवसीय आणि 2 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याला एकूण 3 बळी पटकावण्यात यश आले आहे. 

आशिया चषकासाठी पाकिस्तानचा संघ -
बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, फखर जमान, हैदर अली, हारिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम ज्युनिअर, नसीम शाह, शाहनवाज दहानी आणि उस्मान कादिर.   



 

Web Title: A Pakistani player who has traveled to the UAE for Asia Cup 2022 is worried about the flood situation in the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.