Join us

No-ball, Hit-Wicket अन् Run-out! एकाच चेंडूवर सारं घडलं, तरी पाकिस्तानी फलंदाज Not Out! 

वर्षानुवर्षे आपण जरी क्रिकेट पाहत असलो तरी त्यातील काही नियम हे आजही आश्चर्यचकित करणारे आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2024 17:56 IST

Open in App

शुक्रवारी पाकिस्तानचा फलंदाज शान मसूद ( Shan Masood ) याला आश्चर्यचकित करणाऱ्या  नियमाचा फायदा झाला आणि एकाच चेंडूवर हिट विकेट व रन आऊट होऊनही तो नाबाद राहिला. यॉर्कशायरच्या व्हिटॅलिटी ब्लास्ट विरुद्ध लँकेशायर सामन्यात पाकिस्तानचा कसोटी कर्णधार हिट विकेट आणि धावबाद झाला, परंतु MCC नियमानुसार तो नाबाद राहिला.  

डावाच्या १५व्या षटकात बॉल स्कूप करण्याच्या प्रयत्नात मसूदचा पाय यष्टिंवर आदळला. पण, अम्पायरने तो चेंडू नो बॉल असल्याचा निर्णय दिला आणि त्यानंतर धावा घेण्यासाठी जो रून नॉन स्ट्रायकर एंडवरून पळाला व मसूद खेळपट्टीच्या मध्ये येऊन उबा राहिला. त्यादरम्यान यष्टिरक्षकाने चेंडू उचलून गोलंदाजाकडे दिला व त्याने रन आऊट केले.  त्यानंतरही आश्चर्यकारक परिस्थितीत पंचांनी मसूदला नाबाद ठरवले.   नो बॉल असल्याने मसूदला हिट विकेट बाद दिले गेले नाही. त्यानंतर रन आऊट नाकारला गेला, कारण अम्पायरला असे वाटले की मसूद धाव घेण्याच्या प्रयत्नात नव्हता, कारण फलंदाजाला असे वाटले की तो हिट विकेट झालाय. MCC नियमातील कायदा ३१.७ नुसार एखाद्या फलंदाजाने आऊट झाल्याच्या गैरसमजाखाली विकेट सोडल्याचे समाधान झाल्यास अम्पायर हस्तक्षेप करू शकतो. अम्पायर त्या फलंदाजाला पुन्हा बोलवू शकतात आणि ते चेंडू डेड बॉल जाहीर केला जाऊ शकतो.  

सामन्यानंतर मसूद म्हणाला, " मी शॉट खेळण्याचा प्रयत्न केला आणि चेंडू माझ्या हेल्मेटच्या ग्रिलवर आदळला. त्यानंतर मी तसाच उभा राहिलो, कारण कन्कशन नियमानुसार मला उपचार हवे होते आणि मी गोंधळलो होतो. जो रूट एक धाव घेण्यासाठी पळाला आणि मग मीही पळालो. पण, माझ्यासाठी तो एक डेड बॉल होता.''

टॅग्स :ऑफ द फिल्डटी-20 क्रिकेट