Join us

Jemimah Rodrigues Flying Catch : जबरदस्त! जेमीनं हवेत झेपावत टिपला वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वोत्तम झेल

स्नायू दुखापतीमुळे पेरीनं मैदान सोडलं अन् भारतीय संघाला सामन्यात कमबॅकची एक संधी निर्माण झाली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2025 21:22 IST

Open in App

Jemimah Rodrigues Take Super Catch To Remove Beth Mooney : महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील विशाखापट्टणमच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात भारतीय संघाने दिलेल्या विक्रमी धावंसख्येचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन संघानं कडक रिप्लाय दिला. श्री चरणीनं फीबी लिचफिल्डच्या रुपात ८५ धावांवर ऑस्ट्रलियाला धक्का दिला. मग एलिसा हीलनं पेरीच्या साथीनं दमदार भागीदारी रचली. स्नायू दुखापतीमुळे पेरीनं मैदान सोडलं अन् भारतीय संघाला सामन्यात कमबॅकची एक संधी निर्माण झाली.

जेमीचा 'सुपर वुमन' अवतार; हवेत झेपावत टिपला अप्रतिम झेल 

एलिसा पेरीची जागा घेण्यासाठी आलेल्या आणि मागील सामन्यात शतक झळकवणारी बेथ मूनी टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरू शकली असती. पण जेमीच्या जबरदस्त क्षेत्ररक्षणामुळे टीम इंडियानं तिला स्वस्तात माघारी धाडण्याचा डाव यशस्वी ठरला. ही विकेट दीप्तीच्या खात्यात जमा झाली असली तरी याच सगळं श्रेय हे जेमिमा रॉड्रिग्सलाच द्यावे लागेल. तिने हवेत झेपावत वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वोत्तम झेल टिपत  बेथ मूनीला अवघ्या ४ धावांवर पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. जेमीचा फ्लाइंग कॅच हा टीम इंडियाच्या हातून निसटत चालेला सामना पुन्हा भारतीय संघाच्या बाजूनं झुकवणारा असाच होता.

English
हिंदी सारांश
Web Title : Jemimah Rodrigues' Flying Catch: Best World Cup Catch!

Web Summary : Jemimah Rodrigues took a stunning flying catch to dismiss Beth Mooney in the Women's World Cup. This crucial catch turned the game in India's favor, sending Mooney back for just 4 runs.
टॅग्स :आयसीसी महिला विश्वचषक २०२५भारतीय महिला क्रिकेट संघजेमिमा रॉड्रिग्ज