Join us

David Warner ने अनुष्काच्या फोटोवर कमेंट केली, खवळले नेटिझन्स! द्यावे लागले स्पष्टिकरण, विराटही म्हणाला...  

भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) याने सोशल मीडियावर आज एक पोस्ट केली अन् नेहमीप्रमाणे त्याची चर्चा रंगली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2022 20:30 IST

Open in App

भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) याने सोशल मीडियावर आज एक पोस्ट केली अन् नेहमीप्रमाणे त्याची चर्चा रंगली. आशिया चषक २०२२साठी दुबईमध्ये असलेल्या  विराटला पत्नी अनुष्का शर्माची ( Anushka Sharma) आठवण येतेय, हे त्याच्या लेटेस्ट पोस्टवरून कळतेय. विराटने त्याच्या इंस्टाग्रामवर अनुष्का शर्माचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती क्यूट दिसत आहे. हा फोटो शेअर करताना विराटने 'My (माझं)...' असे लिहीले. पण, त्यावरील ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरच्या ( David Warner) कमेंटने नेटिझन्स खवळले अन् चुकीचा अर्थ लावून त्याच्यावर तुटून पडले.  

विराटच्या पोस्टवर वॉर्नरने Lucky Man, Mate! ( तू खूप भाग्यवान आहेस तुला इतकी चांगली पत्नी मिळाली) अशा आशयाची कमेंट केली. त्यावरून नेटिझन्सने त्याच्यावर टीका करण्यास सुरुवात केली. वॉर्नरला त्याच्या कमेंटवर स्पष्टिकरण द्यावे लागले, त्यावर आम्ही दोघंही लकी आहोत की आमच्या पत्नी पाठीशी खंबीरपणे उभ्या राहतात. दुसऱ्या चाहत्याच्या प्रतिक्रियेवर वॉर्नरने रिप्लाय दिला की,  ही एक म्हण आहे जी आम्ही ऑस्ट्रेलियामध्ये वापरतो, जसे की मी म्हणेन की मी कँडिस वॉर्नर माझ्या आयुष्यात आली हे माझे भाग्य आहे. त्यामुळे जेव्हा आम्ही हे दुसऱ्या साठी म्हणतो तेव्हा तू लकी आहेस मित्रा असे  म्हणतो.

वॉर्नरच्या स्पष्टिकरणानंतर विराट कोहली त्याच्या सपोर्टसाठी आला. त्याने लिहिले मला माहित्येय मित्रा. विराटच्या या पोस्टने नेटिझन्सची बोलती बंद झाली.    

टॅग्स :विराट कोहलीअनुष्का शर्माडेव्हिड वॉर्नर
Open in App