महिला टी२० वर्ल्ड कप २०२६ च्या आशियाई क्वालिफायर मॅचमध्ये अजब गजब गोष्ट घडली. बँकॉक येथे खेळवण्यात आलेल्या लढतीत यूएईच्या संघाने कतार विरुद्धच्या लढतीत सर्वच्या सर्व १० विकेट्स एकाच धावसंख्येवर गमावल्याचे पाहायला मिळाले. क्रिकेटच्या मैदानात एका मॅचमध्ये सर्वच्या सर्व बॅटर्स जाणीवपूर्वक रिटायर्ड आउट होण्याची कदाचित ही पहिलीच वेळ असेल. चक्क मॅच जिंकून सर्वच्या सर्व गुण मिळवण्यासाठी संघाने हा डाव खेळल्याचे पाहायला मिळाले. इथं जाणून घेऊयात नेमकं काय घडलं? त्यासंदर्भातील सविस्तर स्टोरी
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
बिन बाद १९२ धावा अन् याच धावसंख्येवर ऑलआउट झाला संघ
यूएईच्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना १६.१ षटकात एकही विकेट न गमावता १९२ धावा कल्या होत्या. त्यानंतर सर्व टीम याच धावसंख्येवर ऑलआउट झाली. एवढं सगळं घडल्यावर हा सामना यूएई संघानं १६३ धावांनी जिंकला. सामन्यावर पावसाचे सावट दिसू लागल्यावर मॅच अनिर्णित राहून १-१ गुण वाटून घेण्याची वेळ येऊ नये, यासाठी युएई संघाने हा डाव खेळला होता.
टीम इंडियासाठी कायपण! किंग कोहली विचार बदलून कसोटी खेळण्यासाठी तयार होणार?
प्रतिस्पर्धी संघ २९ धावांवर ऑलआउट
यूएईच्या बॅटिंग वेळी संघाची कर्णधार इशा ओझा हिने ११३ धावांची दमदार खेळी केली. तिच्या साथीनं डावाची सुरुवात करणाऱ्या तीर्था सतीश हिने ७१ धावांची खेळी केली. या दोघींनी पहिल्या विकेटसाठी १६.१ षटकात धावफलकावर १९२ धावा लावल्या. त्यानंतर याच धावसंख्येवर सर्व १० बॅटर्संनी रिटायर आउट होण्याचा निर्णय घेतला. सर्वात आधी दोन्ही सलामीवीर राटायर्ड आउट झाल्या. मग अन्य बॅटर्संनी मैदानात हजेरी लावून रिटायर्ड आउट होण्याचा निर्णय घेतला. युएईनं दिलेल्या १९३ धावांचा पाठलाग करताना कतारचा संघ ११.१ षटकात २९ धावांवर ऑलआउट झाला.