Join us

४४ बॉलमध्ये ८४...! रोहित शर्मासोबत 'खेळणारा' तो जितेंद्र भाटवडेकर कोण? रणजी खेळलाय की गल्ली क्रिकेट...

Jitendra Bhatwadekar Viral IPL 2025: आयपीएल २०२५ मध्ये इतर संघांसह मुंबई इंडियन्सनेही बदली खेळाडू घेतले आहेत. एलिमिनेटरच्या सामन्यात रोहितसोबत जॉनी बेअरस्टो सलामीला आला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 11:31 IST

Open in App

आयपीएल आता अंतिम टप्प्यात आली आहे. ऑरपेशन सिंदूरमुळे काही काळ खंड पडल्यानंतर पुन्हा ती सुरु झाली, परंतू बरेचसे परदेशी खेळाडू मायदेशी परतले होते. यामुळे आयपीएलच्या संघांना बदली खेळाडू घ्यावे लागले आहेत. अशातच रोहित शर्माने आपल्या टीममध्ये जितेंद्र भाटवडेकर या अज्ञात प्लेअरची एन्ट्री केल्याने सगळीकडे भाटवडेकरबाबत कुजबुज सुरू झाली आहे. जो तो हा भाटवडेकर कोण असाच प्रश्न विचारत आहे. 

आयपीएल २०२५ मध्ये इतर संघांसह मुंबई इंडियन्सनेही बदली खेळाडू घेतले आहेत. एलिमिनेटरच्या सामन्यात रोहितसोबत जॉनी बेअरस्टो सलामीला आला. तो रायन रिकेल्टनच्या जागी खेळला. बेअरस्टो आणि रोहितने गुजरात टायटन्सविरोधात ८४ धावांची सलामी ठोकली. ४४ चेंडूत ८४ धावा ठोकत गुजरातच्या तोंडचे पाणी पळविले आणि जितेंद्र भाटवडेकरची चर्चा सुरु झाली. तो जितेंद्र भाटवडेकर म्हणजेच जॉनी बेअरस्टो, असे संकेत देणारे ट्विट मुंबई इंडियन्सने टाकले आणि सर्वांना उलगडा झाला. मुंबई इंडियन्सने जॉनी बेअरस्टोचे नाव जितेंद्र भाटवडेकर असे गंमतीने केले होते, परंतू याला ड्रीम ११ च्या मजेशीर जाहिरातीची जोड होती. 

खरेतर जितेंद्र भाटवडेकर नावाचा कोणताही प्लेअर आयपीएलमध्ये नाही किंवा भारताच्या क्रिकेट विश्वातही नाही. परंतू, २०२५ च्या हंगामापूर्वी ड्रीम ११ च्या एका प्रोमोमुळे हे नाव व्हायरल झाले होते. जिथे रोहित शर्मा आणि अभिनेता रणबीर सिंग वि. सूर्यकुमार यादव आणि अभिनेता आमिर खान यांच्यात आपापल्या टीममध्ये प्लेअर घेण्यावरून फोनवरून जुगलबंदी रंगली होती. यावेळी दोन्ही बाजुने एकेका प्लेअरचे नाव आपल्या टीममध्ये घेतले जात होते, तेवढ्यात रोहितने आपल्या टीममध्ये जितेंद्र भाटवडेकर घेत असल्याचे म्हणत फोन कट केला होता. 

रोहितच्या या गुगलीने सुर्या आणि अमिर खान विचारात पडले होते, हा जितेंद्र भाटवडेकर कोण? हे नाव तर कधीच ऐकले नाही, रणजी खेळलाय का असा सवाल आमिरने विचारला होता, यावर सुर्यानेही कदाचित असेल असे म्हटले होते. या गंमतीशीर किस्स्याचे जितेंद्र भाटवडेकर म्हणजेच नावाचे इनिशिअल 'जेबी' हे जॉनी बेअरस्टोशी जुळविण्यात आले आणि हाच तो जितेंद्र भाटवडेकर असे एमआयने जाहीर करून टाकले.

टॅग्स :रोहित शर्माइंडियन प्रिमियर लीग २०२५मुंबई इंडियन्स