Join us

MI च्या ताफ्यातून स्टार झालेल्या पोलार्डची शाहरुखच्या संघाकडून 'हिरोगिरी'! ८ चेंडूत ७ गगनचुंबी षटकार (VIDEO)

पोलार्डशिवाय पूरनचाही धमाका अन्  शाहरुखच्या संघानं जिंकला सामना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 12:39 IST

Open in App

वेस्‍टइंडिजचा माजी कर्णधार आणि मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातून स्टारडम मिळालेला केरॉन पॉलार्डनं घरच्या मैदानातील कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये वादळी खेळीनं लक्षवेधून घेतलं आहे. IPL मध्ये MI च्या ताफ्यातून पॉवर हिटिंग शोमुळे स्टारडम मिळालेला हा क्रिकेटर सध्या CPL मधील शाहरुख खानच्या सह मालकीच्या ट्रिनबागो नायटरायडर्स संघाकडून मैदानात उतरला आहे. यंदाच्या हंगामातील सेंट किट्स अँड नेविस पेट्रियट्स विरुद्ध त्याने २९ चेंडूत ६५ धावांची धमाकेदार इनिंग खेळली.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

या दोन गोलंदाजांवर तुटून पडला पोलार्ड 

३८ ऑलराउंडरनं आपल्या या डावात २ चौकार आणि ८ उत्तुंग षटकार मारले. पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याने ८ चेंडूत ७ षटकार मारल्याचे पाहायला मिळाले. हा पठ्ठ्या नेवियन बिदाइसी आणि वकार सलामखील या दोन गोलदांवर अक्षरश: तुटूनच पडला.

UAE चा कॅप्टन Muhammad Waseem नं साधला मोठा डाव! हिटमॅन रोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला

गेलच्या क्लबमध्ये एन्ट्री

पोलार्डनं बिदाइसीच्या गोलंदाजीवर तीन षटकार मारले. त्यानंतर  सलामखीलच्या षटकात त्याच्या भात्यातून ४ षटकार पाहायला मिळाले. ही वादळी खेळी साकारताना पोलार्डनं अवघ्या २१ चेंडूत अर्धशतक साजरे केले. पोलार्ड हा टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. आतापर्यंत पोलार्डनं  ९५० षटकार मारले आहेत. युनिवर्सल बॉसन नावाने ओळखला जाणारा ख्रिस गेल याबाबतीत टॉपला आहे. त्याने आपल्या टी-२० कारकिर्दीत  १०५६ षटकार मारल्याचा वर्ल्ड रेकॉर्ड आहे. याशिवाय पोलार्डनं टी-२० क्रिकेटमध्ये १४ हजार धावांचा टप्पा पार करत गेलच्या क्लबमध्ये एन्ट्री मारलीये. पोलार्डनं ७१४ सामन्यात १४७० धावा केल्या आहेत. गेलच्या खात्यात  ४६३ सामन्यात १४५६२ धावांची नोंद आहे.

पूरनचाही धमाका अन्  शाहरुखच्या संघाचा दिमाखदार विजय

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याच्या सहमालकीच्या ट्रिनबागो नाइटरायडर्स संघाकडून पोलार्डशिवाय या संघाचे नेतृत्व करणाऱ्या निकोलस पूरन यानेही धमाकेदार खेळी केली. त्याने ३८ चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ५२ धावा कुटल्या. पोलार्डसोबत त्याने चौथ्या विकेटसाठी ९० धावांची भागीदारी रचली. CPL मधील १९ व्या सामन्यात नाइट रायडर्सच्या संघाने १२ धावांनी विजय नोंदवला. 

टॅग्स :किरॉन पोलार्डटी-20 क्रिकेट