Join us  

गरीबीशी संघर्ष करून पूर्ण केलं स्वप्न; भारताचे ८ क्रिकेटपटू ज्यांनी जगावर गाजवलं राज्य!

7 Indian Cricketers Who Fought Poverty जिद्द, चिकाटी, मेहनत आणि प्रबळ इच्छाशक्ती यांच्या जोरावर स्वप्न पूर्ण केली जातात... ज्यांच्याकडे या गोष्टी आहेत त्यांच्या मार्गाच्या आड कितीही संकट आले तरी ते डगमगत नाहीत.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2021 5:05 PM

Open in App

जिद्द, चिकाटी, मेहनत आणि प्रबळ इच्छाशक्ती यांच्या जोरावर स्वप्न पूर्ण केली जातात... ज्यांच्याकडे या गोष्टी आहेत त्यांच्या मार्गाच्या आड कितीही संकट आले तरी ते डगमगत नाहीत. भारतीय क्रिकेटमध्ये अशा संघर्षातून वर आलेल्या खेळाडूंची कमतरता नाही. अशाच सात खेळाडूंबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत, ज्यांनी अत्यंत गरीबीतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं अन् जगावर आपली छाप सोडली. IPL 2021, Arjun Tendulkar : मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात दाखल झाला अर्जुन तेंडुलकर, See Photo

रवींद्र जडेजा ( Ravindra Jadeja ) - सध्याच्या घडीला जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंमध्ये रवींद्र जडेजाचे नाव आघाडीवर आहे. त्यानं आतापर्यंत ५१ कसोटी, १६८ वन डे व ५० ट्वेंटी-२० सामन्यांत टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केलं आहे. कसोटीत त्याच्या नावावर १९५४ धावा ( १ शतक व १५ अर्धशतकं) व २२० विकेट्स आहेत. वन डेमध्ये त्यानं २४११ धावा व  १८८ विकेट्स, तर ट्वेंटी-२०त २१७ धावा व ३९ विकेट्स घेतल्या आहेत. जडेजाचे वडील प्रायव्हेट कंपनीत सुरक्षारक्षक होते आणि आई नर्स होती. ते सरकारी क्वार्टर्समध्ये राहायचे. २००५मध्ये एका अपघातात त्याच्या आईचे निधन झाले आणि तेव्हा जडेजा जवळपास क्रिकेटला रामराम करणार होता.  रवींद्र जडेजाचा राजेशाही थाट; पाहूया त्याचा चार मजली 'रॉयल बंगला'!

महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni ) - आयसीसी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप, आयसीसी वन डे वर्ल्ड कप आणि आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी या आयसीसीच्या तीनही प्रमुख स्पर्धा जिंकणारा जगातील एकमेव कर्णधाराचा मान माहीनं पटकावला आहे. तिकिट कलेक्टर म्हणून काम करणारा माही आज जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंपैकी एक आहे. धोनीनं 90 कसोटी सामन्यांत 38.09 च्या सरासरीनं 6 शतकं व 33 अर्धशतकांसह 4876 धावा केल्या आहेत. 350 वन डे क्रिकेटमध्ये त्याची सरासरी ही 50.57 इतकी आहे. त्याच्या 10773 धावांत 10 शतकं व 73 अर्धशतकांचा समावेश आहे. ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये त्यानं 98 सामन्यांत 1617 धावा केल्या आहेत. यष्टिरक्षणात कसोटीत त्याच्या नावावर 256 झेल व 38 स्टम्पिंग, वन डेत 321 झेल व 123 स्टम्पिंग आणि ट्वेंटी-20त 57 झेल व 34 स्टम्पिंग आहेत. महेंद्रसिंग धोनीचा पहिला पगार किती होता माहित्येय; आज 760 कोटींचा धनी

भुवनेश्वर कुमार ( Bhuvneshwar Kumar ) - टीम इंडियाच्या प्रमुख जलदगती गोलंदाजांपैकी एक असलेल्या भुवीनं नुकतंच इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून पुन्हा पुनरागमन केलं. व्यावसायिक क्रिकेट खेळण्यासाठी एकेकाळी भुवीकडे शूजही नव्हते. त्याच्या कुटुंबीयांनी त्याला नेहमी सपोर्ट केला.  त्यानं टीम इंडियाकडून २१ कसोटी, ११५ वन डे व ४८ ट्वेंटी-२० सामन्यांत अनुक्रमे ६३, १३४ व ४५ विकेट्स घेतल्या आहेत. तेंडुलकरला शून्यावर बाद करणारा एकमेव गोलंदाज, भुवनेश्वर कुमार !

उमेश यादव ( Umesh Yadav ) - भारतीय सैन्यदलात आणि पोलीस खात्यात प्रवेश मिळवण्याता उमेश यादवनं अपयशी प्रयत्न केला. कोणत्याही क्लबचे प्रतिनिधित्व न केल्यामुळे त्याला कॉलेजच्या टीममध्येही स्थान मिळाले नाही. २००७मध्ये त्यानं विदर्भ क्रिकेट असोसिएशन जॉईन केलं अन् नंतर त्यानं मागे वळून पाहिलेच नाही. कोळसा खाणीत त्याचे वडील काम करायचे.. दोन वेळच्या जेवणाचीही त्याच्या घरी मारामार होती. पण, आज उमेश टीम इंडियाचा प्रमुख गोलंदाज आहे. त्यानं ४८ कसोटी, ७५ वन डे व ७ ट्वेंटी-२० सामन्यांत टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केलं आहे. कसोटीत त्याच्या नावावर १४८ विकेट्स, वन डेत १०६ व ट्वेंटी-२० ९ विकेट्स आहेत.

 मुनाफ पटेल ( Munaf Patel ) - ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज ग्लेन मॅकग्राथ याच्यासारखी गोलंदाजी शैली असलेला मुनाफ २०११च्या वन डे वर्ल्ड कप संघाचा सदस्य आहे. त्याचे वडील दुसऱ्यांच्या शेतात काम करायचे. त्याच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती इतकी बिकट होती की त्याचे नातेवाईक त्याला वडिलांसोबत काम करायला सांगायचे. पण, त्याचा निर्धार काही वेगळाच होता.  भारताकडून त्यानं १३ कसोटी, ७० वन डे व ३ ट्वेंटी-२० सामन्यांत एकूण १२५ विकेट्स घेतल्या आहेत. भारताच्या वर्ल्ड कप विजेत्या खेळाडूनं गावात उघडलंय कोव्हिड सेंटर; गंभीर, युवीनं केलं सॅल्यूट!

हरभजन सिंग (  Harbhajan Singh ) - कसोटी क्रिकेटमध्ये हॅटट्रिक घेणारा पहिला भारतीय गोलंदाज म्हणून भज्जीनं इतिहास घडवला. १०३ कसोटीत ४१७, २३६ वन डेत २६९ आणि २८ ट्वेंटी-२० सामन्यांत २५ विकेट्स त्याच्या नावावर आहेत. कसोटीत त्याच्या नावावर दोन शतकं व ९ अर्धशतकंही आहेत. भज्जीच्या घरची परिस्थिती बेताची होती आणि त्यानं ट्रक ड्रायव्हर होण्याचा निर्णयही घेतला होता, परंतु त्यानं संघर्ष करून टीम इंडियाचा यशस्वी गोलंदाज हा प्रवास केला.  भारतीय क्रिकेटपटूला अभिनेत्रीचा होकार मिळवण्यासाठी करावी लागली ११ महिन्यांची प्रतीक्षा!

इरफान व युसूफ पठाण ( Irfan Pathan-Yusuf Pathan ) -भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वात यशस्वी भावडांपैकी एक जोडी. त्यांचे वडील २५० रुपये रोजंदारीवर काम करायचे. मुलांचे क्रिकेटपटू बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते जूनी बुटं विकत घ्यायचे आणि त्यांना शिलाई मारून मुलांना द्यायचे. युसूफनं भारताकडून ५७ वन डे व २२ ट्वेंटी-२० सामने खेळले. वन डे त त्यानं दोन शतकं व ३ अर्धशतकांसह ८१० धावा केल्या. शिवाय ३३ विकेट्स घेतल्या.  इरफाननं २९ कसोटीत ११०५ धावा आणि १०० विकेट्स घेतल्या. १२० वन डे व २४ ट्वेंटी-20 सामन्यांत त्याच्या नावावर अनुक्रमे १५४४ धावा व १७३ विकेट्स आणि १७२ धावा व २८ विकेट्स आहेत. पठाण बंधूंचे समाजकार्यात एक पाऊल पुढे; गरजूंसाठी दान केले 10 हजार किलो तांदूळ 

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीरवींद्र जडेजाइरफान पठाणयुसुफ पठाणभुवनेश्वर कुमार