IPL 2021, Arjun Tendulkar : मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात दाखल झाला अर्जुन तेंडुलकर, See Photo

IPL 2021, Arjun Tendulkar : इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2021) १४व्या पर्वाला सुरूवात होण्यासाठी आता दोन आठवड्यांहून कमी कालावधी शिल्लक राहिला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2021 03:49 PM2021-03-25T15:49:05+5:302021-03-25T15:49:37+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021: Arjun Tendulkar joins Mumbai Indians squad, See Photo | IPL 2021, Arjun Tendulkar : मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात दाखल झाला अर्जुन तेंडुलकर, See Photo

IPL 2021, Arjun Tendulkar : मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात दाखल झाला अर्जुन तेंडुलकर, See Photo

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2021, Arjun Tendulkar : इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2021) १४व्या पर्वाला सुरूवात होण्यासाठी आता दोन आठवड्यांहून कमी कालावधी शिल्लक राहिला आहे. गतविजेता मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) यांच्यात ९ एप्रिलला सलामीचा सामना रंगणार आहे. मुंबई इंडियन्सनं यंदाच्या आयपीएलसाठी झालेल्या लिलावात दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन ( Arjun Tendulkar) याला आपल्या ताफ्यात घेतले. या लालिवात अर्जुन तेंडुलकर हाच सर्वांच्या चर्चेचा विषय होता. लिलावात नाट्यमय रित्या अगदी शेवटी त्याचे नाव आले आणि मुंबई इंडियन्सनं या एकमेव फ्रँचायझींनी त्याच्यावर बोली लावली. २० लाखांच्या मुळ किमतीत तो मुंबई इंडियन्सचा सदस्य झाला. आगामी आयपीएलसाठी गुरूवारी तो MIच्या ताफ्यात दाखल झाला. सूर्यकुमार यादव, इशान किशन यांच्या पदार्पणानं वाढली मुंबई इंडियन्सची डोकेदुखी; IPL 2022त दोघंही MIकडून खेळू शकणार नाहीत!

अनकॅप खेळाडूंच्या यादीत त्याचे नाव घेतलेच नाही अन्...
इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2021) १४व्या पर्वासाठी झालेल्या लिलावाचा शेवट अर्जुन तेंडुलकर ( Arjun Tendulkar) याच्या नावानं झाला. मुश्ताक अली ट्रॉफी ट्वेंटी-20 स्पर्धेतून मुंबईच्या सीनिअर संघात पदार्पण करत अर्जुननं स्वतःसाठी आयपीएलचे दार उघडले. २० लाखांच्या मुळ किमतीत त्याला स्थान मिळाले होते, परंतु अनकॅप खेळाडूंची नावं घेताना अर्जुनचं नाव न आल्यानं सर्वांना आश्चर्य वाटले. मात्र, लिलावाचा शेवट होताना अखेरचं नाव अर्जुनचं आलं आणि मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) या एकमेव संघानं त्याच्यासाठी बोली लावली.   IPL 2021 Schedule : मुंबईत सामने होणार, पण मुंबई इंडियन्स वानखेडेवर नाही खेळणार; जाणून घ्या MI चं संपूर्ण वेळापत्रक

अर्जुन तेंडुलकरची निवड ही पूर्णपणे त्याच्या कौशल्यावर - माहेला जयवर्धने 
 ''अर्जुन तेंडुलकरची निवड ही पूर्णपणे त्याच्या कौशल्यावर केली गेली आहे. सचिन तेंडुलकरचा मुलगा हा टॅग त्याच्यावर लागला आहे, परंतु नशिबानं तो गोलंदाज आहे, फलंदाज नाही. त्यामुळे अर्जुनसारखी गोलंदाजी करता आल्यास सचिनलाही अभिमान वाटेल. अर्जुन तेंडुलकरसाठी ही लर्निंग प्रक्रिया आहे. त्यानं नुकतंच मुंबईसाठी खेळायला सुरुवात केली आहे आणि आता तो फ्रँचायझीकडून खेळणार आहे. तो अजून युवा आहे आणि त्याला बरंच काही शिकायचं आहे. त्याला आम्ही पुरेसा वेळ देणार आहोत आणि त्याच्यावर दबाव आणणार नाही,''असे मुंबई इंडियन्सचे प्रशिक्षक माहेला जयवर्धने यांनी सांगितले होते. IPL Auction 2021 : तुझा अभिमान वाटतो भावा; अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात, सारानं लिहिली पोस्ट...

मुंबई इंडियन्सचा संघ ( Mumbai Indians Full Squad) 
रिटेन खेळाडू : रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, सौरभ तिवारी, जसप्रीत बुमराह, राहुल चाहर, ट्रेंट बोल्ट, जयंत यादव, कीरोन पोलार्ड, क्रु णाल पंड्या, अनुकूल रॉय, इशान किशन, क्विंटन डी कॉक आदित्य तारे, धवल कुलकर्णी, जयंत यादव, क्रि स लिन, मोहसिन खान आणि अनमोलप्रीत सिंग

लिलावात खरेदी केलेले खेळाडू ( Players bought at Auction)- नॅथन कोल्टर नायर ( Nathan Coulter-Nile) ५ कोटी, अॅडम मिल्ने ( Adam Milne) ३.२ कोटी, पीयूष चावला ( Piyush Chawla) २.४ कोटी, जेम्स निशम ( James Neesham) Rs 50 lakh, युधवीर चरक ( Yudhvir Charak) २० लाख, मार्को जॅन्सेन ( Marco Jansen) २० लाख, अर्जुन तेंडुलकर ( Arjun Tendulkar) २० लाख 


 

Web Title: IPL 2021: Arjun Tendulkar joins Mumbai Indians squad, See Photo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.