Join us

चार वर्षांच्या चिमुरडीची बॅटिंग पाहा; कोहली, धोनी, वीरूलाही विसराल!

भारतीय महिला क्रिकेट संघ सातत्यपूर्ण कामगिरी करत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2019 14:43 IST

Open in App

मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघ सातत्यपूर्ण कामगिरी करत आहे. गेल्या दोन वर्षांत भारतीय महिला संघाने आंतरराष्ट्रीय स्थरावर आपलं नाणं खणखणीत वाजवलं आहे. न्यूझीलंड दौऱ्यात भारतीय महिलांनी वन डे मालिका जिंकून इतिहास घडवला. पुरुषांप्रमाणे महिला क्रिकेटलाही आता अच्छे दिन येऊ लागले आहेत आणि त्यांचा फॅन फॉलोअर्सही वाढत चालला आहे. त्यामुळेच मुलीही क्रिकेटकडे करिअर ऑप्शन म्हणून पाहत आहेत. सध्या सोशल मीडियावर एका चिमुरडीचा बॅटिंग करतानाच व्हिडीओ व्हायरल होत आहे आणि तिची फटकेबाजी कोहली, धोनी, वीरू यांच्या खेळीचा विसर पाडणारी ठरत आहे. 

भारतीय महिला संघ मायदेशात आयसीसी महिला वर्ल्ड चॅम्पियन्सशीप स्पर्धेत इंग्लंड महिला संघाचा सामना करणार आहे. तीन वन डे व तीन ट्वेंटी-20 सामन्यांच्या मालिकेत सातत्यपूर्ण कामगिरी करून भारतीय महिला 2021 च्या वर्ल्ड कपच्या तयारीला लागल्या आहेत. वन डे मालिकेत विजय मिळवून वर्ल्ड कप स्पर्धेसाठी थेट पात्रता मिळवण्याच्या दृष्टीने पाऊल उचलण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे. जेमिमा रॉड्रीग्ज व स्मृती मानधना यांच्या फटकेबाजीने सध्या सर्वांचे लक्ष वेधले आहे. वर्ल्ड चॅम्पियन्सशीप स्पर्धेत भारतीय संघाने पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार दिला आहे आणि त्याचा फटका त्यांना 2021 च्या वर्ल्ड कप स्पर्धेत बसू शकतो. भारतीय महिला संघाला वर्ल्ड कपमध्ये थेट पात्रता मिळवणे अवघड होऊ शकते.

पाकिस्तानच्या महिला संघाने वेस्ट इंडिजला नमवून गुणतालिकेत क्रमवारीत चौथ्या स्थानावर झेप घेतली. भारत आणि पाकिस्तान यांच्या खात्यात प्रत्येकी 12 गुण झाले आहेत, परंतु नेट रनरेटमुळे भारतीय महिला तिसऱ्या स्थानी आहेत. त्यामुळे भारतीय संघाने पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार दिल्यास त्यांना सहा गुणांचा फटका बसू शकतो आणि पाकिस्तानला आघाडी घेण्याची संधी मिळू शकते. त्यामुळे भारतीय महिला संघ इंग्लंडविरुद्ध दमदार कामगिरी करण्यासाठी तयार आहे. भारतीय महिला क्रिकेटपटूंच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे त्यांचा फॅन फॉलोअर्सही वाढला आहे. ओडिशाच्या एका गावातील चार वर्षांची चिमुरडीनेही भारतीय क्रिकेटपटूंच्या कामगिरीतून प्रेरणा घेत, क्रिकेटची निवड केली आहे. तिची फटकेबाजी भल्याभल्या प्रोफेशनल क्रिकेटपटूंनाही अचंबित करणारी आहे.

पाहा व्हिडीओ... 

टॅग्स :आयसीसीबीसीसीआयभारतीय महिला क्रिकेट संघ