3TC : तीन संघांमध्ये प्रथम फलंदाजी कोण करणार? असा झाला निर्णय; थोड्याच वेळात लाईव्ह अॅक्शन

3 T cricket असा झाला प्रथम फलंदाजीचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2020 02:30 PM2020-07-18T14:30:46+5:302020-07-18T14:31:05+5:30

whatsapp join usJoin us
3TC : SolidarityCup where three teams will play one match, know who will bat first  | 3TC : तीन संघांमध्ये प्रथम फलंदाजी कोण करणार? असा झाला निर्णय; थोड्याच वेळात लाईव्ह अॅक्शन

3TC : तीन संघांमध्ये प्रथम फलंदाजी कोण करणार? असा झाला निर्णय; थोड्याच वेळात लाईव्ह अॅक्शन

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

कोरोना व्हायरसच्या संकटात इंग्लंड-वेस्ट इंडिज मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात झाली. त्यामुळे आता हळुहळु क्रिकेटही पूर्वपदावर येऊ लागले आहे. आज दक्षिण आफ्रिकेत एका आगळ्यावेगळ्या सामन्याचं आयोजन केलं गेलं आहे. तीन संघ, एक सामना अशा या सामन्याची संकल्पना आहे आणि त्यात एबी डिव्हिलियर्स, क्विंटन डी'कॉक आदी तगडी फौज मैदानावर उतरणार आहे. Solidarity Cup असे या सामन्याला नाव देण्यात आले आहे आणि क्रिकेटमध्ये प्रथमच असा प्रयोग होत असल्यानं सर्वांना त्याची उत्सुकताही लागलेली आहे. ( 3TC Solidarity Cup South Africa) 


3T सामन्याचे नियम काय?

Solidarity Cup असे या मॅचला नाव देण्यात आले आहे. प्रत्येक संघात 8 खेळाडूंचा समावेश असेल आणि 36 षटकांच्या सामन्यात प्रत्येक संघाला 12 षटकं खेळण्याची संधी दिली जाणार आहे.
एक संघ उर्वरित दोन संघांविरुद्ध 6-6 षटकांच्या ब्रेकसह 12 षटके फलंदाजी करेल. संघातील सातवा गडी बाद झाल्यावर नाबाद फलंदाज फलंदाजी करू शकेल. पण, त्याची एकेरी धाव ग्राह्य धरली जाणार नाही. त्यामुळे त्याला केवळ दुहेरी धाव घ्यावी लागेल.
प्रत्येक गोलंदाज जास्तीत जास्त तीन षटके टाकू शकतो. 12 षटकांत सर्वाधिक धावा करणारा संघ विजेता घोषित केला जाईल.
विजेत्या खेळाडूला सुवर्णपदक, उपविजेत्या संघाला रौप्यपदक तर तिसऱ्या क्रमांकावरील संघाला कांस्यपदक दिले जाईल. सामना टाय झाल्यास सुपर ओव्हरमध्ये निकाल लावला जाईल.
पण, जर पावसानं व्यत्येय आणल्यास षटकं कमी केली जातील.  

काईट्स - टेंम्बा बवूमा ( कर्णधार), जॉन-जॉन स्मट्स, डेव्हीड मिलर, ड्वेन प्रेटोरीअस, लुथो सिपाम्ला, बेऊरन हेनड्रीक्स, अॅनरिच नॉर्ट्जे 
किंगफिशर - रिझा हेनड्रीक्स ( कर्णधार), हेनरिच क्लासेन, जॅनेमन मलान, फॅफ ड्यू प्लेसिस, थंडो एनटिनी, गेराल्ड कोएत्झी, ग्लेंटोन स्टूर्मन, तरबेझ शॅम्सी.
ईगल्स - एबी डिव्हिलियर्स ( कर्णधार), एडन मार्कराम, रॅसी व्हॅन डेर ड्युसेन, कायले व्हेरेयन्ने, अँडील फेहलुकवायो, बीजोर्न फॉर्टून, ज्युनियर डाला, लुंगी एनगिडी 

या सामन्यात तीन संघ सहभागी झाल्यामुळे नाणेफेक कशी होईल, याची उत्सुकता होती. त्यातही एक शक्कल लढवण्यात आली. तीनही संघाच्या कर्णधारांसमोर तीन बॉक्स ठेवण्यात आले आणि त्यात नंबर असेलेले चेंडू होते. 1 नंबरचा चेंडू ज्याला मिळेल त्याची पहिली फलंदाजी... एबी डिव्हिलियर्सनं पहिला बॉक्स निवडला आणि त्यात 3 क्रमांकाचा चेंडू निघाला. त्यानंतर टेंबा बमूमानं चेंडू निवडला आणि रिझा हेनड्रीक्स यानं.... त्यामुळे किंगफिशन पहिली फलंदाजी, काईट्स पहिली गोलंदाजी करणार आहेत.

यूएईत की महाराष्ट्रात? IPL 2020 चं भविष्य ठाकरे अन् मोदी सरकारच्या हातात!

तीन टीम, एक मॅच; आज रंगणार क्रिकेटचा जबरदस्त सामना, जाणून घ्या संघ, वेळ अन् नियम!

बीसीसीआयला मोठा धक्का, IPLच्या माजी विजेत्या संघाला द्यावे लागतील 4800 कोटी; जाणून घ्या कारण 

महेंद्रसिंग धोनीचा हटके लूक; CSKनं शेअर केला व्हिडीओ

आव्हानातही आनंद साजरा करणं, हे फक्त सैनिकांनाच जमू शकतं; वीरूनं शेअर केला इमोशनल Video

Web Title: 3TC : SolidarityCup where three teams will play one match, know who will bat first 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.