पुढील दहा वर्षात २९ आयसीसी स्पर्धांचे आयोजन; २०२७ च्या विश्वचषकात १४ संघांचा सहभाग

आयसीसीने जाहीर केलेल्या एफटीपीनुसार २०२४ ते २०३१ या कालावधीत पुरुष आणि महिला गटात प्रत्येकी ८-८ स्पर्धांचे आयोजन होईल. २०२७ च्या वन डे विश्वचषकात १४ संघांचा समावेश असेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2021 07:04 AM2021-06-03T07:04:33+5:302021-06-03T07:05:00+5:30

whatsapp join usJoin us
29 ICC tournaments in the next ten years | पुढील दहा वर्षात २९ आयसीसी स्पर्धांचे आयोजन; २०२७ च्या विश्वचषकात १४ संघांचा सहभाग

पुढील दहा वर्षात २९ आयसीसी स्पर्धांचे आयोजन; २०२७ च्या विश्वचषकात १४ संघांचा सहभाग

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

दुबई : पुढील दहा वर्षांत आयसीसीच्या २९ स्पर्धांचे आयोजन होईल. आयसीसीने जाहीर केलेल्या एफटीपीनुसार २०२४ ते २०३१ या कालावधीत पुरुष आणि महिला गटात प्रत्येकी ८-८ स्पर्धांचे आयोजन होईल. २०२७ च्या वन डे विश्वचषकात १४ संघांचा समावेश असेल. २००३ नंतर प्रथमच सुपर सिक्स फाॅर्मेटमध्ये सामने खेळविले जातील.२०१८ ला रद्द झालेली चॅम्पियन्स ट्रॉफी पुन्हा सुरू होणार असून, आघाडीचे आठ संघ स्पर्धेत सहभागी होतील. २००५ आणि २०२९ ला ही स्पर्धा होईल. टी-२० विश्वचषकासाठी सहभागी संघांची संख्या २० करण्यात आली आहे. यंदा भारतात टी-२० विश्वचषक आयोजित होत असून, २०२२ चा विश्वचषक ऑस्ट्रेलियात होणार आहे.

भारत-पाकिस्तान सामने दरवर्षी 
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी असते. दोन्ही संघ आयसीसीच्या स्पर्धांमध्ये एकमेकांविरुद्ध खेळतात. आयसीसीच्या भविष्यकालीन दौरा कार्यक्रमानुसार २०२४ ते २०३१ अशा कालावधीतील दरवर्षी टी-२० विश्वचषक, वन डे विश्वचषक, चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत-पाकिस्तान सामने खेळले जातील. यंदाच्या टी-२० विश्वचषकापासून उभय संघांत सामना पाहायला मिळणार आहे.

महिला एफटीपी वेळापत्रक
वर्ष     स्पर्धा     संघ     सामने
२०२४     टी-२० विश्वचषक     १०     २३
२०२५     वन डे विश्वचषक     ८     ३१
२०२६     टी-२० विश्वचषक     १२     ३३
२०२७     चॅम्पियन्स ट्रॉफी     ६     १६
२०२८     टी-२० विश्वचषक     १२     ३३
२०२९     वन डे विश्वचषक     १०     ४८
२०३०     टी-२० विश्वचषक     १२     ३३
२०३१     चॅम्पियन्स ट्रॉफी     ६     १६

पुरुष एफटीपी वेळापत्रक
वर्ष     स्पर्धा     संघ     सामने
२०२४     टी-२० विश्वचषक     २०     ५५
२०२५     चॅम्पियन्स ट्रॉफी     ८     १५
२०२५     डब्ल्यूटीसी फायनल     २     १
२०२६     टी-२० विश्वचषक     २०     ५५
२०२७     वन डे विश्वचषक     १४     ५४
२०२७     डब्ल्यूटीसी फायनल     २     १
२०२९     टी-२० विश्वचषक     २०     ५५
२०२९     चॅम्पियन्स ट्रॉफी     ८     १५
२०२९     डब्ल्यूटीसी फायनल     २     १
२०३०     टी-२० विश्वचषक     २०     ५५
२०३१     वन डे विश्वचषक     १४     ५४
२०३१     डब्ल्यूटीसी फायनल     २     १

Web Title: 29 ICC tournaments in the next ten years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.