२५ वर्षांपूर्वी काही लाख होता टीम इंडियाच्या प्रशिक्षकाचा पगार; आज रवी शास्त्री घेतात विराट कोहलीपेक्षा अधिक मानधन

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर टीम इंडियाला नवे मुख्य प्रशिक्षक मिळणार आहे. रवी शास्त्री ( Ravi Shastri) यांचा कार्यकाळ वर्ल्ड कप स्पर्धेनंतर संपुष्टात येत असून त्यांनी करार वाढवण्यास नकार दिला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2021 04:18 PM2021-10-19T16:18:27+5:302021-10-19T16:19:25+5:30

whatsapp join usJoin us
25 years ago, the salary of a Team India coach was a few lakhs; Today Ravi Shastri gets more honorarium than Virat Kohli | २५ वर्षांपूर्वी काही लाख होता टीम इंडियाच्या प्रशिक्षकाचा पगार; आज रवी शास्त्री घेतात विराट कोहलीपेक्षा अधिक मानधन

२५ वर्षांपूर्वी काही लाख होता टीम इंडियाच्या प्रशिक्षकाचा पगार; आज रवी शास्त्री घेतात विराट कोहलीपेक्षा अधिक मानधन

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

How salary of Indian cricket coach has seen a huge hike over the years :  ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर टीम इंडियाला नवे मुख्य प्रशिक्षक मिळणार आहे. रवी शास्त्री ( Ravi Shastri) यांचा कार्यकाळ वर्ल्ड कप स्पर्धेनंतर संपुष्टात येत असून त्यांनी करार वाढवण्यास नकार दिला आहे. बीसीसीआयनंही नव्या प्रशिक्षकांसह काही पदांसाठी नुकतीच जाहिरात प्रसिद्ध केली आहे. टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदावर राहुल द्रविड ( Rahul Dravid) याचे नाव आघाडीवर आहे, परंतु अजूनही अधिकृत घोषणा झालेली नाही. पण, यापेक्षा अधिक चर्चा होतेय ती द्रविडला वर्षाला दिला जाणाऱ्या पगाराची... सूत्रांच्या माहितीनुसार राहुल द्रविडनं मुख्य प्रशिक्षकपद स्वीकारल्यास त्याला १० कोटी रुपये पगार दिला जाईल. 

२५ वर्षांपूर्वी टीम इंडियाचे प्रशिक्षक असलेले मदन लाल यांचा महिन्याचा पगार हा ५ लाख रुपये होता, म्हणजेच वर्षाला ६० लाख पगार मिळत होता. पण, २५ वर्षांत प्रशिक्षकाचा पगार कऐक पटीनं वाढला आहे. BCCIच्या सेंट्रल करारानुसार कर्णधार विराट कोहलीला वर्षाला ७ कोटी इतके मानधन दिले जाते. म्हणजेच मुख्य प्रशिक्षकाला कर्णधार कोहलीपेक्षा अधिक मानधन मिळते. रवी शास्त्री यांना मुख्य प्रशिक्षक म्हणून ९.५ ते १० कोटी पगार दिला जातो. त्यामुळे शास्त्री हे जगात सर्वाधिक पगार घेणारे क्रिकेट प्रशिक्षक आहेत. 

रवी शास्त्री यांच्या कार्यकाळात भारतीय संघानं दोन वेळा ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरच्या मैदानावर कसोटी मालिकेत नमवले. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतही भारतानं २-१ अशी आघाडी घेतली  होती. पहिल्याच जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या ( WTC) फायनलमध्येही भारतानं प्रवेश केला होता. पण, शास्त्रींच्या कार्यकाळात भारताला एकही आयसीसी ट्रॉफी जिंकता आली नाही. 

१९८३च्या वर्ल्ड कप विजेत्या संघातील सदस्य मदन लाल हे १९९६-९७ साली टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक होते आणि त्यांना महिन्याला ५ लाख रुपये पगार दिला जायचा. १९९९-२००० मध्ये माजी कर्णधार कपिल देव हे मुख्य प्रशिक्षक बनले आणि त्यांना प्रती सामना ४ लाख आणि अतिरिक्त बोनस असे मानधन दिले गेले. गॅरी कर्ट्सन ( २००८ ते २०११) व ग्रेग चॅपेल ( २००५ ते २००७)  यांना वर्षाला अनुक्रमे २.५ व १.२५ कोटी मानधन दिला गेला. २०१७मध्ये रवी शास्त्रींकडे मुख्य प्रशिक्षकपद आले आणि त्यांना वर्षाला ८ कोटी मानधन दिलं गेलं. २०१९मध्ये त्यांच्या पगारात २० टक्के वाढ केली गेली.  

२०१६-१७ या कालावधीत अनिल कुंबळे हे टीम इंडियाचे प्रशिक्षक होते आणि त्यांचा पगार ६ कोटी इतका होता. २०११ ते २०१५ या कालावधीत मुख्य प्रशिक्षक असलेल्या डंकन फ्लेचर यांना ४.२ कोटी मानधन दिले गेले.   

Web Title: 25 years ago, the salary of a Team India coach was a few lakhs; Today Ravi Shastri gets more honorarium than Virat Kohli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.