Join us
Daily Top 2Weekly Top 5

2011 वर्ल्ड कप फायनल फिक्स? श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकारा अन् माहेला जयवर्धनेचं महत्त्वाचं विधान 

श्रीलंकेनं विजयासाठी ठेवलेलं 275 धावांच लक्ष्य टीम इंडियानं सहज पार केलं.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2020 18:31 IST

Open in App

श्रीलंकेचे माजी क्रीडा मंत्री महिंदनंदा अलूठगमगे यांनी 2011च्या वर्ल्ड कप स्पर्धेतील सामना फिक्स असल्याचा दावा केला. भारत आणि श्रीलंका यांच्यात तो सामना खेळला गेला आणि भारतानं 6 विकेट्स राखून सामना जिंकला. भारतानं 28 वर्षानंतर वन डे वर्ल्ड कपवर पुन्हा नाव कोरले होते. पण, या सामन्यावर अनेकदा फिक्सिंगचे आरोप झाले आणि आता क्रीडा मंत्र्यांच्या दाव्यानं पुन्हा चर्चेला उधाण आलं आहे. अलूठगमगे यांच्या आरोपांवर श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकारा आणि माजी फलंदाज माहेला जयवर्धने यांनी महत्त्वाचे विधान केले आहे.

श्रीलंकेनं विजयासाठी ठेवलेलं 275 धावांच लक्ष्य टीम इंडियानं सहज पार केलं. गौतम गंभीरच्या 97 धावा आणि महेंद्रसिंग धोनीच्या नाबाद 91 धावांच्या जोरावर भारतानं हा सामना जिंकला. या सामन्यात संगकारानं श्रीलंकेचं नेतृत्व सांभाळले होते. अलुठगमागे हे 2011मध्ये श्रीलंकेचे क्रीडा मंत्री होते. त्यांनी सांगितले की,''मी या वक्तव्याची संपूर्ण जबाबदारी घेतो. फक्त मला याबाबत अधिक खुलासा करायचा नाही, कारण मला देशाची इभ्रत महत्त्वाची आहे. 2011ची वर्ल्ड कप फायनल फिक्स होती. यात कोणता खेळाडू सहभागी नव्हता, परंतु एक गट होता जो या कटात सहभागी होता.''

संगकारानं ट्विट केलं की,''मॅच फिक्स असल्याच्या आरोपाचे पुरावे त्यांनी आयसीसीकडे  आणि भ्रष्टाचार विरोधी पथकाकडे सादर करावेत. त्यानंतर त्यांच्या दाव्याची सखोल चौकशी केली जाईल.'' जयवर्धनेनंही ट्विट केलं. तो म्हणाला, निवडणूका जवळ येत आहेत वाटतं.. आता सर्कस सुरू होईल. नावं आणि पुरावे कुठेत?

अन्य महत्त्वाच्या बातम्या

Big News : सात वर्षांच्या बंदीनंतर एस श्रीसंतचे संघात पुनरागमन होणार

कोरोना पॉझिटिव्ह शाहिद आफ्रिदीचा नवा व्हिडीओ व्हायरल; म्हणतो, 'त्या' सर्व अफवा!

निसर्ग वादळात उद्ध्वस्त झालेलं गाव पुन्हा उभं करण्यासाठी पृथ्वी शॉचा पुढाकार!

पाकिस्तानचा गोलंदाज हसन अली बनला 'स्ट्रीट डान्सर'; Video Viral 

भन्नाट Video : लेफ्ट-राईट नव्हे, तर मोहम्मद रफी यांच्या गाण्यावर दिलं जातंय पोलीस प्रशिक्षण

आयला.... युजवेंद्र चहलनं शेअर केला मुलीचा फोटो; तिच्याबद्दल जाणून तुम्हाला बसेल धक्का

 2011ची वर्ल्ड कप फायनल फिक्स होती, माजी क्रीडा मंत्र्यांचा धक्कादायक दावा 

Photo: टीम इंडियाच्या 'गब्बर'ची मुलगी आहे बिनधास्त; बॉयफ्रेंडसोबत मुंडन केल्यानं आली होती चर्चेत!

टॅग्स :कुमार संगकारामहेला जयवर्धनेआयसीसीमॅच फिक्सिंग