Join us  

Good News : देशातील क्रिकेट चाहत्यांसाठी BCCI अन् सरकारचा मोठा निर्णय

देशातील क्रिकेट चाहत्यांना BCCI अन् सरकारकडून अनोखी भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2020 3:38 PM

Open in App

कोरोना व्हायरसमुळे जगभरातील क्रीडा स्पर्धा रद्द किंवा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. इंडियन प्रीमिअर लीग ( आयपीएल) वरही अनिश्चिततेचं सावट आहे. त्यात लॉकडाऊनमुळे सर्वाना घरीच रहावं लागत आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांची हिरमोड झाली आहे. पण, क्रिकेट चाहत्यांसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ( बीसीसीआय) आणि सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. ही गोड बातमी ऐकून सर्व क्रिकेट चाहत्यांना नक्कीच आनंद होणार आहे.

जगभरात कोरोनाचे 12 लाख 74, 543 रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 69, 487 जणांचा मृत्यू झाला आहे. भारतातील रुग्णांचा आकडा हा 4314 वर पोहोचला असून आतापर्यंत 118 जणांचा मृत्यू झाला आहे. 328 रुग्ण बरे झाले आहेत. बीसीसीआय आणि सरकार क्रिकेट चाहत्यांसाठी 2000 च्या दशकाच्या सामन्यांचे पुनःप्रक्षेपण करण्याचा निर्णय घेतला आहे. 7 ते 14 एप्रिलपर्यंत हे सामने DD Sports वर दाखवण्यात येणार आहेत.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या वर्ल्ड कप स्पर्धेत आतापर्यंत झालेले क्रिकेट सामने पुन्हा पाहता येणार आहेत. तोही प्रत्येक चेंडूसह... स्टार स्पोर्ट्स 1 या वाहीनीनं भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वर्ल्ड कप स्पर्धेतील सामन्यांचे पुनर्प्रक्षेपण करण्याचा निर्णय घेतला आहे.

केव्हा पाहाता येतील हे सामने ?4 ते 10 एप्रिल या कालावधीत हे सामना दररोज सकाळी 11 वाजल्यापासून दाखवण्यात येतील4 एप्रिल - 1992 चा वर्ल्ड कप 5 एप्रिल - 1996 चा वर्ल्ड कप6 एप्रिल - 1999 वर्ल्ड कप7 एप्रिल - 2003 वर्ल्ड कप8 एप्रिल - 2011 वर्ल्ड कप9 एप्रिल - 2013 वर्ल्ड कप10 एप्रिल -  2019 वर्ल्ड कप  

अन्य महत्त्वाचा बातम्या

पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला क्रीडापटूंची साथ; सचिनपासून ते मेरी कोमपर्यंत सारे झाले सहभागी!

आफ्रिदीच्या मदतीसाठी आवाहन करणाऱ्या युवराज सिंगचं लाखोंचं दान

हरभजन सिंग अन् त्याच्या पत्नीची समाजसेवा; 5000 कुटुंबांना पुरवणार रेशन

Video : अजिंक्य रहाणेकडून तुळजापूरच्या शेतकऱ्याचं कौतुक, तुम्हीही ठोकाल कडक सॅल्यूट

पठाण बंधूंचे समाजकार्यात एक पाऊल पुढे; गरजूंसाठी दान केले 10 हजार किलो तांदूळ 

गौतम गंभीरची दिल्ली सरकारला आणखी 50 लाखांची मदत; मुख्यमंत्र्यांवर टीका

मास्टर स्ट्रोक; 2011च्या वर्ल्ड कप फायनलमधील 'तो' गेम चेंजर निर्णय सचिन तेंडुलकरचा होता!

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघबीसीसीआय