Join us

२०० प्लस टार्गेट! फिफ्टी हुकली; पण Prithvi Shaw च्या भात्यातून आली 'एकदम कडक' खेळी

पृथ्वी शॉनं तुफान फटकेबाजीसह मुंबई संघाला दमदार सुरुवात करून दिली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2024 16:29 IST

Open in App

Syed Mushtaq Ali Trophy 2024 Prithvi Shaw : सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेतील विदर्भ संघाविरुद्धच्या सामन्यात मुंबईकर पृथ्वी शॉनं संघाला एकदम कडक सुरुवात करुन दिली. युवा सलामीवीर गेल्या काही दिवसांपासून क्रिकेट बाहेरील गोष्टी आणि ढासळलेल्या कामगिरीमुळे चर्चेत आहे. रणजी स्पर्धेतून त्याला मुंबईच्या संघातून वगळल्याचेही पाहायला मिळाले. पण त्यानंतर सय्यद मुश्ताक अली स्पर्धेसाठी त्याची पुन्हा संघात वर्णी लागली. साखळी फेरीतील प्रत्येक सामन्यात अपयशी ठरलेल्या पृथ्वी शॉनं उपांत्य पूर्व सामन्यात धमाकेदार बॅटिंग करून लक्षवेधून घेतले. त्याच्या भात्यातून बॅटिंगचा क्लास शो पाहायला मिळाला. 

विदर्भ संघानं २२२ धावांचे टार्गेट सेट केल्यावर अनुभवी अजिंक्य रहाणेच्या साथीनं पृथ्वीनं मुंबई संघाच्या डावाची सुरुवात केली.  अलुर क्रिकेट स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात ५ चौकार आणि ४ षटकार अशी दमदार फटकेबाजी करत त्याने २६ चेंडूत ४९ धावा केल्या. त्याचे अर्धशतक अवघ्या एका धावेनं हुकलं. पण महत्त्वाच्या सामन्यात आणि संघाला दमदार सुरुवात करुन देण्याची गरज असताना त्याच्या भात्यातून उपयुक्त खेळी आली आहे. त्यामुळे फिफ्टीपेक्षाही त्याची ही खेळी कडक ठरते.

टॅग्स :पृथ्वी शॉअजिंक्य रहाणेबीसीसीआयटी-20 क्रिकेट