IND vs AFG 3rd T20I : सूर्यकुमार यादव सध्या भारताच्या ट्वेंटी-२० संघाचा भाग नाही. जागतिक ट्वेंटी-२० क्रमवारीत नंबर १ फलंदाज असलेल्या सूर्यकुमारला दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरील वन डे मालिकेत दुखापत झाली. त्यानंतर त्याला अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेला मुकावे लागले आणि बुधवारी त्याच्या घोट्यावर शस्त्रक्रिया केली गेली. पण, शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्याने त्वरित त्याचा iPad घेतला आणि रोहित शर्माची अफगाणिस्तानविरुद्धची रेकॉर्ड ब्रेकींग सेन्चुरी पाहिली.
सूर्यकुमारची पत्नी देविशा शेट्टीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. जो तिने सूर्याच्या सर्जरीनंतर लगेचचाच आहे. या व्हिडीओत सूर्या हॉस्पिटल बेडवर बसून भारत-अफगाणिस्तान यांच्यातल्या सामन्यातील हायलाईट्स त्याने पाहिले. देविशाने स्टोरीत लिहिले आहे की, या माणसावर २० मिनिटांपूर्वी शस्त्रक्रिया झाली आणि तो काय करत असेल, याचा अंदाज तुम्ही बांधा. तो क्रिकेट पाहतोय...
देविशाने तिच्या पतीसाठी एक हृदयस्पर्शी पोस्ट लिहिली. "माझा स्ट्रॉंग बॉय. तुला शांत आणि प्रतिसाद न देणारे पाहणे खूप कठीण होते. पण नंतर तू डोळे उघडलेस आणि माझ्याकडे पाहून हसलास. त्या एका हसण्याचा अर्थ खूप आहे. तुला लवकरच मैदानावर परतताना पाहण्याची वाट पाहत आहे."
पार्लमध्ये गेल्या महिन्यातच सूर्यकुमारच्या घोट्याला दुखापत झाली होती आणि तेव्हापासून तो क्रिकेटपासून दूर आहे. या महिन्याच्या सुरुवातीला सूर्याला स्पोर्ट्स हर्निया झाल्याचे समोर आले होते आणि तो जर्मनीमध्ये शस्त्रक्रियेसाठी जाणार आहे. सूर्याला प्रशिक्षण सुरू करण्यापूर्वी आणखी ८-९ महिन्यांचा वेळ लागण्याची अपेक्षा आहे. तो मुंबई इंडियन्ससाठी आयपीएल २०२४ खेळण्यासाठी वेळेत तंदुरुस्त होईल की नाही हे या क्षणी सांगता येणे अवघड आहे.