असा विक्रम होणे नाही; न्यूझीलंडच्या गोलंदाजाची अनोखी डबल हॅटट्रिक

न्यूझीलंडची महिला गोलंदाज रोजमॅरी मेयरने गुरुवारी अनोखा विक्रमाची नोंद केली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2019 17:24 IST2019-11-07T17:23:41+5:302019-11-07T17:24:00+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
New Zealand's Rosemary Mair's 4 wickets in 4 balls and 4 maidens | असा विक्रम होणे नाही; न्यूझीलंडच्या गोलंदाजाची अनोखी डबल हॅटट्रिक

असा विक्रम होणे नाही; न्यूझीलंडच्या गोलंदाजाची अनोखी डबल हॅटट्रिक

न्यूझीलंडची महिला गोलंदाज रोजमॅरी मेयरने गुरुवारी अनोखा विक्रमाची नोंद केली. तिनं येथे सुरू असलेल्या श्रीम्प्टन चषक आंतर जिल्हा क्रिकेट स्पर्धेत डबल हॅटट्रिकची नोंद केली. विशेष म्हणजे आतापर्यंत अशी कामगिरी कुणाला करता आलेली नाही. रोजमॅरीनं 4 षटकांत एकही धाव न देता 4 विकेट्स घेतल्या. 

हॉक बे संघाचे प्रतिनिधित्व करताना मेयरनं 16 चेंडूंत 33 धावा चोपल्या. त्यात दोन चौकार व तीन षटकारांचा समावेश होता. तिनं व्हिक्टोरिया पार्कच्या गोलंदाजांची धुलाई केली. न्यूझीलंडच्या या 21 वर्षीय गोलंदाजानं भारताविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. आतापर्यंत तिनं तीन वन डे सामने खेळले आहेत. 

 

Web Title: New Zealand's Rosemary Mair's 4 wickets in 4 balls and 4 maidens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.