मुंबई : भारतीय संघाने विंडीज मालिकेत ट्वेंटी-20, वन डे आणि कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. त्यानंतर टीम इंडिया मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ट्वेंटी-20 व कसोटी मालिका खेळणार आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या पत्नी अनुष्का शर्मासोबत क्वालिटी टाईम स्पेंड करत आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यातून मायदेशात परतलेल्या कोहलीनं बुधवारी सोशल मीडियावर अनुष्कासोबतचा 'HOT' फोटो शेअर केला. त्यानंतर चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊसच पाडला. 


 भारताने वेस्ट इंडिजवर कसोटी मालिकेत 2-0 असा दणदणीत विजय मिळवला. या विजयानंतर कोहलीने भारताकडून सर्वाधिक सामने जिंकण्याचा इतिहास रचला. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने सहजच विजय मिळवला. भारताने दुसऱ्या डावात वेस्ट इंडिजचा संघ 210 धावांवर संपुष्टात आणला. त्यामुळे, 257 धावांनी विजय मिळवत दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताने 2-0 ने कसोटी मालिका जिंकली.

कोहलीनं परदेशात सर्वाधिक विजय मिळवणाऱ्या भारतीय कर्णधारांत सौरव गांगुलीला ( 11 विजय)  मागे टाकले आहे. कोहलीनं 27 सामन्यांत 13 विजय मिळवले आहेत. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने परदेशात सहा कसोटी सामने जिंकण्याचा पराक्रम केला होता. शिवाय भारतीय कर्णधार म्हणून सर्वाधिक कसोटी विजय आता कोहलीच्या नावावर आहेत. कोहलीच्या नावावर आता 28 कसोटी विजय आहेत आणि कोहलीने धोनीला (27 विजय) पिछाडीवर सोडले आहे. कोहलीनं 48 कसोटीत हा पराक्रम केला आणि धोनीपेक्षा 12 सामने कमी खेळून त्याने ही मजल मारली आहे.

विराट कोहलीच्या घड्याळात सोनं आणि हिरे, किंमत पाहाल तर हैराण व्हाल...

अनुष्काच्या तालावर थिरकला विराट, पाहा व्हायरल फोटो

Photo : टीम इंडियासोबत अनुष्काची समुद्र सफर!

अनुष्काचा बिकिनीतील फोटो पाहून विराट 'घायाळ', इमोजीतून केली 'दिल की बात'

कोहलीनं बुधवारी अनुष्कासोबत शेअऱ केलेला फोटो पाहा...


Web Title: Must See; Virat kohli shared 'HOT' photo with Anushka sharma
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.