Anushka Sharma in bikini sets fire to the beach. Virat Kohli has the best reaction | अनुष्काचा बिकिनीतील फोटो पाहून विराट 'घायाळ', इमोजीतून केली 'दिल की बात'
अनुष्काचा बिकिनीतील फोटो पाहून विराट 'घायाळ', इमोजीतून केली 'दिल की बात'

जमैका : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा तिच्या बिकनीतल्या फोटोमुळे सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. अनुष्का सध्या चित्रपटांपासून दूर आहे. पण, ती सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टीव्ह आहे. भारतीय क्रिकेट संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे आणि तेथेही अनुष्का पती विराटसोबत दिसलली होती. पण, आता अनुष्कानं तिचा बिकनीतील फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. त्या फोटोवर विराटलाही कमेंट देण्याचा मोह आवरता आला नाही. 

अनुष्का शर्माने शेअर केलेल्या या फोटोत तिने ऑरेंज रंगाचा स्विम सुट परिधान केला आहे. या फोटोत अनुष्का समुद्राच्या किनारी बसली असून तिने ड्रॉप इयररिंग व सनग्लासेस घातले आहेत. हा फोटो शेअर करत तिने कॅप्शन दिलं की,''Sun kissed & blessed'' 


या फोटोमुळे नेटिझन्स अनुष्काला ट्रोल करत असले तरी पती कोहलीनं तिचे कौतुक केले आहे. त्याने इमोजीतून अनुष्काचे कौतुक केले आहे. कोहलीच्या या इमोजीला जवळपास 20 हजार चाहत्यांनी लाईक्स दिले आहेत.

कॅप्टन कोहलीच्या अव्वल स्थानाला धोका; 'हा' फलंदाज काही पावले दूर

कोहलीने पूर्ण केला 11 वर्षांचा प्रवास, पाहा यामध्ये काय घडले खास

 


Web Title: Anushka Sharma in bikini sets fire to the beach. Virat Kohli has the best reaction
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.