Mitchell Starc Set Multiple Records AUS vs ENG 2nd Test : अॅशेस कसोटी मालिकेतील ब्रिस्बेन येथील गाबाच्या मैदानात मिचेल स्टार्कनं गोलंदाजीनंतर फलंदाजीसह मैफील लुटली. अष्टैपलून कामगिरीसह या पठ्ठ्यानं विक्रमांची अक्षरश: बरसात केल्याचे पाहायला मिळाले. इंग्लंडच्या पहिल्या डावात फलंदाजांसाठी अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर मिचेल स्टार्कनं ६ विकेट्सचा डाव साधला. तिसऱ्या दिवसाच्या खेळात फलंदाजीला आल्यावर त्याने कसोटीतील १२ व्या शतकासह खास विक्रमाला गवसणी घातली. कसोटीत सर्वोत्तम अष्टपैलूपैकी एक असलेल्या बेन स्टोक्सला जे जमलं नाही ते मिचल स्टार्कनं करून दाखवलं.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अॅशेस कसोटी मालिकेत असा पराक्रम करणारा ठरला चौथा खेळाडू
पहिल्या डावात गोलंदाजीवेळी ७५ धावा खर्च करून ६ विकेट्स घेतल्यावर फलंदाजीवेळी मिचेल स्टार्कनं इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई केली. १४१ चेंडूचा सामना करताना त्याने १३ चौकाराच्या मदतीने ७७ धावांची दमदार खेळी केली. या कामगिरीसह स्टार्क अॅशेस कसोटी मालिकेत २००० नंतर ५ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स आणि अर्धशतक झळकवणारा चौथा आणि ऑस्ट्रेलियाचा दुसरा खेळाडू ठरला. स्टार्क आधी मिचेल जॉनसन याने २०१० आणि २०१३ मध्ये अशी कामगिरी केली होती.
५३१ धावांचं आव्हान, सातव्या विकेटसाठी विक्रमी भागीदारी, विंडीजकडून जोरदार पाठलाग, अखेरीस असा लागला निकाल
अॅशेस कसोटीत फाइव्ह विकेट्स हॉलसह फिफ्टी झळकवणारे खेळाडू
अँड्र्यू फ्लिंटॉफ -द ओव्हल, २००५
स्टुअर्ट ब्रॉड- लीड्स, २००९
मिचेल जॉन्सन- पर्थ, २०१०
मिचेल जॉन्सन- ब्रिस्बेन, २०१३
मिचेल स्टार्क- ब्रिस्बेन, २०२५
पिंक बॉल टेस्टमध्ये ५० पेक्षा अधिक धावा अन् ५ विकेट्सचा डाव साधणारे खेळाडू
दिलरुवान पेरेरा (श्रीलंका) विरुद्ध पाकिस्तान, दुबई २०१७
जेसन होल्डर (वेस्टइंडिज) विरुद्ध श्रीलंका, ब्रिजटाउन २०१८
मिचेल स्टार्क (ऑस्ट्रेलिया) विरुद्ध इंग्लंड, ब्रिसबेन २०२५
WTC मध्ये १०० विकेट्स आणि १००० धावांचा आकडा गाठणाऱ्या खास एलिट क्लबमध्ये एन्ट्री
स्टार्कनं अर्धशतकी खेळीसह WTC मध्ये १०० धावांचा टप्पाही पार केला. १०० विकेट्स आणि १००० धावा करणाऱ्या खास खेळाडूंच्या यादीत त्याने एन्ट्री मारली आहे. त्याच्याआधी पॅट कमिन्स आर. अश्विन, रवींद्र जडेजा आणि क्रिस वोक्स यांनी WTC मध्ये अशी कामगिरी केली आहे.