लंडन येतील लॉर्ड्सच्या मैदानात दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेतील फायनल सामना खेळवण्यात येत आहे. पहिल्यांदा फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियन संघ अडचणीत सापडला असताना स्टिव्ह स्मिथनं दमदार अर्धशतक झळकावले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
स्टीव्ह स्मिथचा कॅच घेताना मार्को यान्सेनची 'कसरत'
स्टीव्ह स्मिथ आपली ही खेळी आणखी मोठी करुन ऑस्ट्रेलियन संघाला दिलासा देईल, असे वाटत असताना एडन मार्करमनं त्याला आपल्या जाळ्यात अडकवले. कव्हर ड्राइव्ह मारण्याच्या नादत स्मिथ फसला अन् बॅटची कड घेऊन चेंडू स्लिपमध्ये फिल्डिंग करत असलेल्या मार्को यान्सेनकडे गेला. झेल वेळी "एक दो तीन'.. अशी अशी 'कसरत' करत अखेर तिसऱ्या प्रयत्नात मार्को यान्सेन याने हा झेल टिपला अन् स्मिथचा खेळ खल्लास झाला.
WTC Final : आधी निर्धाव षटकांचा मारा! मग रबाडानं टाकली डबल विकेट ओव्हर; ख्वाजावर ओढावली ही नामुष्की
लॉर्ड्सच्या मैदानात स्टीव्ह स्मिथनं सेट केला नवा रेकॉर्ड
ऑस्ट्रेलियन संघाच्या खराब सुरुवातीनंतर स्टीव्ह स्मिथनं ११२ चेंडूत १० चौकाराच्या मदतीने ६६ धावांची खेळी केली. संघाला मोठ्या संकटातून बाहेर काढणाऱ्या या खेळीसह स्मिथनं क्रिकेटच्या पंढरीत नवा इतिहास रचला आहे. लॉर्ड्सच्या मैदानात कसोटीत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आता स्मिथच्या नावे झाला आहे. याआधी हा विक्रम ऑस्ट्रेलियन दिग्गज वॉरेन बार्डस्ली (Warren Bardsley) यांच्या नावे होता. ३६ वर्षीय ऑस्ट्रेलियन बॅटरनं इंग्लंडमधील ऐतिहासिक मैदानावर तीन अर्धशतके आणि दोन शतके झळकावली आहेत, २०१५ मध्ये इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या अॅशेस कसोटीत या मैदानात त्याने २१५ धावांची सर्वोच्च खेळी साकारली होती. त्याच्या खात्यात या मैदानात आता १० डावात ५९१ धावांची नोंद झाली आहे.
लॉर्ड्सच्या मैदानातील कसोटीत सर्वाधिक धावा करणारे पाहुण्या संघातील फलंदाज (Visiting Batters)
- स्टीव्ह स्मिथ (ऑस्ट्रेलिया) - १० डावांमध्ये ५९१ धावा
- वॉरेन बार्डस्ली (ऑस्ट्रेलिया) - ७ डावांमध्ये ५७५ धावा
- गॅरी सोबर्स (वेस्ट इंडीज) - ९ डावांमध्ये ५७१ धावा
- डॉन ब्रॅडमन (ऑस्ट्रेलिया) - ८ डावांमध्ये ५५१ धावा
- शिवनारायण चंद्रपॉल (वेस्ट इंडीज) - ९ डावांमध्ये ५१२ धावा
Web Title: Marco Jansen Juggles Twice Before Taking Catch To Dismiss Steve Smith in WTC 2025 Final After He breaks record for most Test runs at Lord Watch Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.