KKR vs SRH Latest News & Live Score : Indian Premier League ( IPL 2020) आजच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad) आणि कोलकाता नाइट रायडर्स ( Kolkata Knight Riders) भिडणार आहेत. दोन्ही संघांना पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या (MI) सामन्यात KKRचा कर्णधार दिनेश कार्तिक याच्या फसलेल्या रणनीतीवर टीका झाली होती. दुसरीकडे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( RCB) विरुद्धच्या सामन्यात विजयाच्या समीप येऊन SRHला पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे पहिल्या सामन्यातील चुका सुधारून आज दोन्ही संघ विजयाची चव चाखण्यासाठी मैदानावर उतरणार आहेत.  

KKR vs SRH Latest News & Live Score
 

KKR vs SRH Latest News : दिनेश कार्तिकच्या स्मार्ट नेतृत्वाला खेळाडूंची साथ; KKRने चाखली विजयाची चव

- KKRने 18 षटकांत 3 बाद 145 धावा करून पहिला विजय मिळवला. गिल 62 चेंडूंत 5 चौकार व 2 षटकार खेचून 70 धावांवर नाबाद राहिला. मॉर्गननेही 29 चेंडूंत 3 चौकार व 2 षटकारांसह नाबाद 42 धावा केल्या. 

- युवा फलंदाज शुबमन गिल एका बाजूनं खिंड लढवत होता. त्यानं 42 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. त्यानं इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गनसह भक्कम भागीदारी करताना KKRची विजयाच्या दिशेनं वाटचाल करून दिली


 

- सातव्या षटकार कर्णधार वॉर्नरनं त्याचा हुकमी खेळाडू काढला. रशीद खाननं ( Rashid Khan) त्याच्या पहिल्याच षटकात KKRचा कर्णधार दिनेश कार्तिकला बाद केले. 

Image

- लक्ष्याचा पाठलाग करताना दुसऱ्याच षटकात खलील अहमदनं KKRचा सलामीवीर सुनील नरीन ( Sunil Narine) याला बाद केले. त्यानंतर आलेल्या नितिश राणानं ( Nitish Rana) SRHच्या गोलंदाजांची धुलाई केली. त्यानं 13 चेंडूंत 6 चौकारांसह 26 धावा केल्या. टी नटराजननं त्याला बाद केले. 

- वृद्धीमान सहा ( Wriddhiman Saha ) आणि मनीष पांडे ( Manish Pandey ) यांनी तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करताना SRHला समाधानकारक पल्ला गाठण्याच्या दिशेनं कूच करून दिली. मनीषनं 35 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. आंद्रे रसेलनं ( Andre Russell) ही भागीदारी संपुष्टात आणली. 18व्या षटकात मनीष पांडे 38 चेंडूंत 51 धावा ( 3 चौकार व 2 षटकार) करून माघारी परतला. सहा 30 धावांवर रन आऊट झाला. SRHला 20 षटकांत 4 बाद 142 धावांपर्यंतच मजल मारता आली. 

- वृद्धीमान सहा ( Wriddhiman Saha ) आणि मनीष पांडे ( Manish Pandey ) यांनी तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करताना SRHला समाधानकारक पल्ला गाठण्याच्या दिशेनं कूच करून दिली. मनीषनं 35 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. 

IPL पाहताना रडायचा, राहुल द्रविडनं आत्मविश्वास वाढवला अन् आज KKRकडून केलं पदार्पण

-  वॉर्नर आणि मनीष पांडे यांनी दमदार खेळ करताना SRHचा डाव सावरला. दिनेश कार्तिकच्या फिल्ड प्लेसमेंटनं आज सर्वांची वाहवाह मिळवली. पण, 10व्या षटकात वॉर्नरचा झंझावात रोखण्यात KKRला यश आलं. वरुण चक्रवतीनं त्याच्याच गोलंदाजीवर वॉर्नरला झेलबाद करून माघारी पाठवले. वॉर्नरने 30 चेंडूंत 36 धावा केल्या. 

- जॉनी बेअरस्टो ( Jonny Bairstow) आणि डेव्हिड वॉर्नर ( David Warner) यांनी SRHला सावध सुरुवात करून दिली. मागील सामन्यात महागडा ठरलेल्या पॅट कमनिन्सनं ( Pat Cummins) चौथ्या षटकात KKRला पहिले यश मिळवून दिले. चौथ्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर पंचांनी बेअरस्टोला झेलबाद दिले, परंतु DRSमध्ये तो नाबाद असल्याचे समोर आले. मात्र, पुढच्याच चेंडूवर कमिन्सने त्याचा त्रिफळा उडवला. 

- कमलेश नागरकोटीचे पदार्पण
2018च्या युवा वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात बांगलादेशविरुद्ध 18 धावांत 3 महत्त्वाच्या विकेट घेणाऱ्या कमलेश नागरकोटीलने आज IPLमध्ये पदार्पण केले. 2018च्या लिलावात KKRने त्याला 3.2 कोटींत आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले होते, परंतु दुखापतीमुळे त्याला दोन मोसमात खेळता आले नाही. 14 फेब्रुवारी 2018मध्ये तो अखेरचा लिस्ट ए सामना खेळला होता.  

IPL 2020तील आतापर्यं झालेल्या 7 सामन्यात नाणेफेक जिंकलेल्या कर्णधारानं प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. पण, आजचा सामना त्याला अपवाद ठरला. SRHचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर ( David Warner) याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्याच्या या निर्णयानं सर्वांना धक्का बसला, परंतु आव्हानासाठी सज्ज असल्याचे वॉर्नरने स्पष्ट केले. 
सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad XI) : डेव्हिड वॉर्नर, मनीष पांडे, प्रियांक गर्ग, वृद्धीमान सहा, मोहम्मद नबी, रशीद खान, अभिषेक शर्मा, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, टी नटराजन.  


कोलकाता नाइट रायडर्स ( Kolkata Knight Riders XI) : शुबमन गिल, सुनील नरीन, नितिश राणा, दिनेश कार्तिक, इयॉन मॉर्गन, आंद्रे रसेल, पॅट कमिन्स, शिवम मावी, कुलदीप यादव, कमलेश नागरकोटी, वरुण चक्रवर्थी 

'फॅफ'ब्यूलस कॅच, KL राहुलचे शतक अन् MS Dhoniचे चुकलेले डावपेच; कसा राहिला IPL 2020 चा पहिला आठवडा, Video

अन्य महत्त्वाच्या बातम्या

"बुलेट ट्रेन येईल, पण MS Dhoni चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येणार नाही; मोदी जी आता तुम्हीच समजवा"

IPL 2020 : CSKचे बुडते जहाज वाचवण्यासाठी सुरेश रैना कमबॅक करणार? फ्रँचायझीने दिले महत्त्वाचे अपडेट्स

इंडियन प्रीमिअर लीग की Injury Premier League? आतापर्यंत 8 खेळाडू झाले दुखापतग्रस्त! 

CSK vs DC सामन्यात 'तिने' सर्वांचे लक्ष वेधले, नेटिझन्स सर्च इंजिनवर तुटून पडले

हे अति झालं, असं तुम्हाला वाटत नाही का? सुनील गावस्कर यांच्या कमेंटवर झरीन खान भडकली

- KKRविरुद्धच्या सामन्याला रवाना होण्यापूर्वी जॉनी बेअरस्टोनं सहकाऱ्यांसोबत साजरा केला बर्थ डे! 

वेदर रिपोर्ट । दिवसाचे तापमान ३७ डिग्री सेल्सियसच्या आसपास राहण्याची शक्यता, पण ह्युमिडिटी ५६ टक्के असू शकते. हवेचा वेग १८ किलोमीटर प्रतितास राहण्याची शक्यता.

पिच रिपोर्ट । या लढतीतही खेळपट्टी गोलंदाजांना अनुकूल राहील, पण फलंदाज स्थिरावले तर धावा होऊ शकतात.

मजबूत बाजू
कोलकाता। सुनील नारायणसारखा जागतिक दर्जाचा गोलंदाज आणि रसेल व मॉर्गन यांच्यासारखे फलंदाज संघात आहेत.
हैदराबाद । डेव्हिड वॉर्नर सलामीवीर व कर्णधार. केन विलियम्सनने पुनरागमन केले तर मधली फळी मजबूत. गोलंदाजी प्रभावशली. राशिद खान व भुवनेश्वर कुमार यांची उपस्थिती. राशिदच्या साथीला नबीला संधी मिळू शकते.

कमजोर बाजू
कोलकाता । कर्णधार दिनेश कार्तिक निर्णय घेण्याच्या क्षमतेत कमकुवत. फलंदाजी क्रमामध्येही अनेक उणिवा. गेल्या लढतीत रसेल व मॉर्गन यांना खालच्या स्थानावर फलंदाजीची संधी. नारायणलाही उशिरा गोलंदाजीला पाचारण.
हैदराबाद । मधली फळी ढेपाळणे. अष्टपैलू मिशेल मार्शची स्पर्धेतून माघार. 

ImageImage

SRH vs KKR Head To Head
एकूण सामने - 17
कोलकाता नाइट रायडर्स  - 10
सनरायझर्स हैदराबाद - 7 
 
भुवनेश्वर कुमारने ( Bhuvneshwar Kumar) KKRविरुद्ध 20 सामन्यांत सर्वाधिक 27 विकेट्स घेतल्या आहेत.  
डेव्हिड वॉर्नरने ( David Warner) KKRविरुद्ध 21 डावांत 43.63 च्या सरासीनं 829 धावा चोपल्या आहेत. त्यात दोन शतकं व 4 अर्धशतकांचा समावेश आहे.


 

English summary :
KKR vs SRH Live Score Kolkata Knight Riders vs Sunrisers Hyderabad IPL 2020 Live Score and Match updates

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: KKR vs SRH Live Score Kolkata Knight Riders vs Sunrisers Hyderabad IPL 2020 Live Score and Match updates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.