Karun Nair And Devdutt Padikkal Hit Show Against Mumbai And Karnataka Into Semifinals VHT : विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील पहिल्या क्वार्टर फायनल लढतीत करुण नायर आणि देवदत्त पडिक्कलच्या दमदार खेळीच्या जोरावर कर्नाटक संघाने मुंबईला स्पर्धेतून बाहेर काढले आहे. दुसऱ्या क्वार्टरफायनलमध्ये सौराष्ट्र संघाने उत्तर प्रदेश संघाला बाहेरचा रस्ता दाखवत सेमीच तिकिट पक्के केले. १२ जानेवारीला बंगळुरुस्थित बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलेन्सच्या वेगवेगळ्या मैदानात खेळवण्यात आलेल्या दोन्ही क्वार्टर फायनल लढतीत पावसाचा व्यत्यय आला. त्यामुळे दोन्ही सेमीफायनलिस्ट हे VJD पद्धतीनुसार ठरवण्यात आले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
करुण नायरची देवदत्त पडिक्कलच्या साथीनं नाबाद शतकी भागीदारी
पहिल्या क्वार्टर फायनल लढतीत मुंबईच्या संघाने शम्स मुलानीच्या पहिल्यांदा फलंदाजी करताना २५४ धावा करत ८६ धावांच्या जोरावर मुंबईच्या संघाने निर्धारित ५० षटकात ८ विकेट्सच्या मोबदल्यात २५४ धावा करत गत विजेत्या कर्नाटक संघासमोर २५५ धावांचे टार्गेट सेट केले होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना कर्नाटक संघाचा कर्णधार मयंक अग्रवाल अवघ्या १२ धावांवर बाद झाला. पण त्यानंतर देवदत्त पडिक्कल आणि करुण नायर जोडी जमली. पडिक्कलने आपला यंदाच्या हंगामातील फॉर्म कायम ठेवत ९५ चेंडूत नाबाद ८१ धावा केल्या. दुसऱ्या बाजूला करुण नायर याने ८० चेंडूत ७४ धावा केल्या. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी १४२ चेंडूत १४३ धावा करत ३३ व्या षटकात संघाच्या धावफलकावर १८७ धावा लावल्या होत्या. पावसाच्या व्यत्ययामुळे सामना थांबल्यामुळे VJD पद्धतीनुसार कर्नाटकच्या संघाने ५५ धावांनी विजय मिळवला.
Vijay Hazare Trophy : निर्णायक क्षणी मुशीर खान ठरला फ्लॉप; मुंबई संघासाठी शम्स मुलानीची एकाकी झुंज
रिंकूचा संघही आउट; पावसाच्या खेळात १७ धावांनी गमावला सामना
दुसऱ्या क्वार्टर फायनलमध्ये उत्तर प्रदेश आणि सौराष्ट्र यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात रिंकू सिंहच्या नेतृत्वाखालील UP च्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना अभिषेक गोस्वामी ८८ (८२) आणि समीर रिझवी ८८ (७७) यांच्या दमदार खेळीच्या जोरावर निर्धारित ५० षटकात ८ विकेट्च्या मोबदल्यात ३१० धावा करत सौराष्ट्र संघासमोर ३११ धावांचे टार्गेट सेट केले होते. या धावांचा पाठलाग करताना सौराष्ट्र संघाकडून सलामीवीर हार्विक देसाई याने नाबाद शतक झळकावले. सौराष्ट्र संघाच्या डावातील ४०.१ षटकांनंत पावसाचा व्यत्यय आला. खेळ थांबला त्यावेळी सौराष्ट्र संघाच्या धावफलकावर ३ बाद २३८ धावा होत्या. VJD पद्धतीनुसार या संघाला १७ धावांनी विजय मिळाला.