Ishan Kishan Smashed A Hundred In Just 33 Balls Batting At No 6 In Vijay Hazare Trophy : देशांतर्गत टी-२० क्रिकेटमधील सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेतील फायनलमध्ये विक्रमी सेंच्युरी झळकावत इशान किशन याने टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या संघात एन्ट्री मारली. आता विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील एकदिवसीय सामन्यातील शतकासह त्याने आगामी टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील प्लेइंग इलेव्हनमधील दावेदारी ठोकणारी शानदार सेंच्युरी झळकावली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
सहाव्या क्रमांकावर येऊन ठोकली शानदार सेंच्युरी
अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर रंगलेल्या कर्नाटक विरुद्धच्या लढतीत झारखंडच्या संघाकडून इशान किशन याने सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन ३९ चेंडूत ३२० च्या स्ट्राइक रेटसह १२५ धावांची दमदार खेळी केली. त्याने अवघ्या ३३ चेंडूत शतक झळकावले. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेतील फायनलनंतर त्याच्या भात्यातून देशांतर्गत क्रिकेट सामन्यात आलेले ह सलग दुसरे शतक आहे.
Vijay Hazare Trophy: कॅप्टनची वैभवपेक्षा जलद सेंच्युरी! बिहारनं ५७४ धावांसह सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
आगामी टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत प्लेइंग इलेव्हनची दावेदारी ठोकणारी खेळी
इशान किशन याला टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान मिळाले आहे. पण प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळण्यासाठी त्याची संजूसोबत कडवी टक्कर आहे. संजू सॅमसन याने सलामीवीराच्या रुपात आपली दावेदारी भक्कम केली असताना इशान किशनला बाकावर बसण्याची वेळ येऊ शकते. पण विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील खेळीसह त्याने खालच्या फळीत फलंदाजी करतानाही धमाका करण्याची क्षमता दाखवून देत कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करताना धमाका करण्याची क्षमता असल्याचे दाखवून दिले आहे.
एक चूक नडली! त्याची मोठी किंमतही मोजली आता...
इशान किशन हा कमालीची प्रतिभा असणारा खेळाडू आहे. २०२३ च्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर तो संघाचा भाग होता. पण त्याने मानसिक आरोग्याचे कारण दाखवत मालिकेतून माघार घेतली होती. त्यानंतर दुबईमध्ये तो पार्टी साजरा करतानाचे काही फोटो व्हायरल झाले. संघात असून प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळत नसल्यामुळे त्याने दौरा सोडल्याची चर्चाही त्यावेळी रंगली. याची मोठी किंमतही या क्रिकेटरला मोजावी लागली. संघाबाहेर गेल्यावर वार्षिक करारबद्ध खेळाडूंच्या यादीतूनही त्याचा पत्ता कट झाला. आता पुन्हा त्याला एक संधी मिळाली आहे. विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरीसह तो आगामी टी-२० संघातील आपली प्लेइंग इलेव्हनमधील दावेदारी भक्कम करू शकतो.