IPL Royal challenger Banglore has only less than 2 crore rupees in his purse for IPL 2020 Auction  | IPL 2020: विराट कोहलीच्या RCBला खरेदी करता येणार नाही मोठा खेळाडू, जाणून घ्या कारण
IPL 2020: विराट कोहलीच्या RCBला खरेदी करता येणार नाही मोठा खेळाडू, जाणून घ्या कारण

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल) 2020च्या मोसमासाठी येत्या 19 डिसेंबरला कोलकाता येथे लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. या लिलावात प्रत्येक संघ आपापल्या ताफ्यात दमदार खेळाडूंना सहभागी करून घेण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे. पण, या लिलावात विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर बंगळुरू संघाला एकही मोठा खेळाडू घेता येणार नाही. त्याच्या मागे एक कारण आहे आणि ते आकड्यातून समोर येत आहेत.

लिलावासाठी प्रत्येक संघाकडे काही पैसे शिल्लक आहेत. त्यानुसार बंगळुरूकडे दोन कोटीहून कमी रक्कम आहे. त्यामुळे त्यांना लिलावात मोठ्या खेळाडूला आपल्या ताफ्यात दाखल करून घेता येणार नाही. बंगळुरूच्या खात्यात 1.8 कोटी रुपये आहेत आणि मोठ्या खेळांडूंची मुळ किंमतच दोन कोटीपासून सुरू होते. अशा परिस्थितीत बंगळुरूला मोठा खेळाडू घेता येणार नाही. जर प्रत्येक फ्रेंचायझींना आपापल्या पर्समधून 3-3 कोटी जमा करण्याची मुभा दिली, तर बंगळुरु एखादा मोठा खेळाडू घेऊ शकतो.  

जाणून घेऊया कोणाच्या खात्यात किती रूपये 
दिल्ली कॅपिटल्स – 7.7 कोटी
राजस्थान रॉयल्स – 7.15 कोटी
कोलकाता नाइट राइडर्स – 6.05 कोटी
सनराइजर्स हैदराबाद – 5.30 कोटी
किंग्ज इलेव्हन पंजाब – 3.7 कोटी
मुंबई इंडियन्स – 3.55 कोटी
चेन्नई सुपर किंग्स – 3.2 कोटी
रॉयल चॅलेंजर बंगळुरू – 1.80 कोटी

IPLचा उद्घाटन सोहळा म्हणजे पैशांचा अपव्यय; 2020 च्या लीगसाठी मोठा निर्णय
इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल) उद्घाटन सोहळ्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला ( बीसीसीआय) जवळपास 30 कोटी रुपये मोजावे लागतात. 2008 पासून सुरू झालेल्या या लीगचा उद्धाटन सोहळा हा दणक्यात साजरा केला जातो. या सोहळ्यात बॉलिवूडच्या सेलिब्रेटींचे परफॉर्मन्स होतात. पण, हा उद्धाटन सोहळा म्हणजे पैशांचा अपव्यय, असे मत व्यक्त केले जात आहे. त्यामुळेच 2020च्या लीगच्या उद्घाटन सोहळ्याबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.


मुंबईतील बीसीसीआय मुख्यालयात पार पडलेल्या आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत हा मुद्दा चर्चिला गेला. यामध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. 2020च्या मोसमात ‘पॉवर प्लेयर’ ही नवी संकल्पना राबविण्यात येणार अशी चर्चा होती, परंतु बीसीसीआयच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय लांबणीवर टाकण्यात आला आहे.  पॉवर प्लेअर ही संकल्पना स्थानिक क्रिकेटमध्ये राबवण्यात येईल, असे एकमत झाले. त्यामुळे आगामी मुश्ताक अली ट्वेंटी-20 स्पर्धेत हा पर्याय वापरला जाईल.

Web Title: IPL Royal challenger Banglore has only less than 2 crore rupees in his purse for IPL 2020 Auction 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.