IPL 2025 RR vs MI Ball Boy Came and Touched The Feet Of Rohit Sharma : आयपीएलच्या १८ व्या हंगामातील ५० व्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या संघाने राजस्थान रॉयल्स संघाला १०० धावांनी पराभूत केले. या विजयासह मुंबई इंडियन्सच्या संघाने गुणतालिकेत अव्वलस्थान पटकावले. दुसरीकडे पराभवासह राजस्थान रॉयल्सचा स्पर्धेतील प्रवास संपुष्टात आला. या सामन्यात रोहित शर्माच्या भात्यातून संयमी अर्धशतकी खेळी पाहायला मिळाली. एकही षटकार न मारता त्याने हंगामातील तिसरे अर्धशतक साजरे केले. त्याच्या या खेळीशिवाय या मॅच दरम्यान बॉल बॉय आणि रोहित शर्मा यांच्यातील खास दृश्य दाखवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. इथं जाणून घेऊयात नेमकं काय घडलं त्यासंदर्भात सविस्तर माहिती
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मैदानात नेमकं काय घडलं? इथं पाहा व्हायरल व्हिडिओ
जो व्हिडिओ व्हायरल होतोय त्यात मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार आणि स्टार बॅटर रोहित शर्मा सीमारेषेबाहेर उभे असल्याचे दिसते. मुंबई इंडियन्सच्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्ससमोर २१८ धावांचे टार्गेट सेट केले होते. दुसऱ्या डावात फिल्डिंगसाठी मैदानात जात असताना रोहित शर्मा सहकाऱ्यांची वाट बघत सीमारेषेच्या बाहेर थांबल्याचे या व्हिडिओमध्ये दिसून येते. त्यावेळी मॅचमध्ये बॉल बॉयच्या रुपात सीमारेषेवर थांबलेला एक मुलगा रोहितच्या दिशेने धावत येतो. तो रोहितच्या पाया पडतानाही दिसून येते. रोहित शर्मा या चाहत्याला पाठीवर थाप मारत असू दे असं काहीसे बोलत पाया पडण्यापासून रोखताना दिसून येते.
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
फिल्डसह फिल्डबाहेरही दिसते रोहितची क्रेझ
रोहित शर्मा हा मुंबई इंडियन्सचा कर्णधार नसला तरी तो या संघाचा कणा आहे. अडखळत सुरुवात केल्यावर तो लयीत आला अन् मुंबई इंडियन्सच्या संघानेही गती पकडलीये. भारतीय संघाला एका वर्षात दोन आयसीसी ट्रॉफी जिंकून देणाऱ्या कर्णधाराची देशभरातील प्रत्येक मैदानात खास क्रेझ पाहायला मिळते. कधी कधी तर सामना पाहण्यासाठी आलेले प्रेक्षकही रोहितला भेडण्यासाठी सुरक्ष कवच तोडून मैदानात घुसल्याचे पाहायला मिळाले आहे. जयपूरच्या मैदानात रोहितला भेटण्याची संधी मिळाल्यावर बॉल बॉय हिटमॅन रोहितच्या पाया पडताना दिसून आले.
Web Title: IPL 2025 RR vs MI A Ball Boy Came and Touched The Feet Of Rohit Sharma After MI Win Video Goes Viral
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.