IPL 2025 RR vs GT : १४ वर्षांच्या वैभव सूर्यंवशीच्या शतकी खेळीसह यशस्वी जैस्वालच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर राजस्थान रॉयल्सच्या संघाने २०० पारची लढाई अगदी आरामात जिंकली. गुजरात टायटन्सच्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना शुबमन गिल आणि जोस बटलरच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर निर्धारित २० षटकात ४ विकेट्सच्या मोबदल्यात २०९ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना वैभव सूर्यंवशी याने आपल्या आयपीएल कारकिर्दीतील तिसऱ्या सामन्यात पहिले शतक झळकावत अनेक विक्रमाला गवसणी घातली. तो माघारी फिरल्यावर यशस्वी जैस्वाल आणि रियान पराग या जोडीनं १५.५ षटकात २ विकेट्च्या गमावत २१२ धावा करत ८ विकेट्स आणि २५ चेंडू राखून सामना जिंकला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
वैभवची ऐतिहासिक खेळी, यशस्वीचाही तोरा राजस्थानच्या संघाने दिमाखात जिंकला सामना
आयपीएल स्पर्धेतील आव्हान टिकवून ठेवण्यासाठी राजस्थान रॉयल्सच्या संघाला हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकायचा होता. जर सामना गमावला तर स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येणार हे पक्के होते. हा दबाव त्यात २०० पेक्षा अधिक धावांचे टार्गेट घेऊन मैदानात उतरलेल्या यशस्वी जैस्वाल आणि वैभव सूर्यवंशी यांनी बेधडक अंदाजात फटकेबाजी केली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी १६६ धावांची भागीदारी रचली. वैभव सूर्यंवशी याने ३८ चेंडूत ७ चौकार आणि ११ षटकाराच्या मदतीने १०१ धावांची ऐतिहासिक खेळी केली. याशिवाय यशस्वी जैस्वाल याने ४० चेंडूत ९ चौकार आणि २ षटकाराच्या मदतीने नाबाद ७० धावांची खेळी केली. रियान परागने १५ चेंडूत २ चौकार आणि २ षटकाराच्या मदतीने नाबाद ३२ धावांची खेळी केली. गुजरात टायटन्सकडून प्रसिद्ध कृष्णा आणि राशीद खान यांना प्रत्येकी एक एक विकेट मिळाली.
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
शुबमन गिल-जोस बटलरची अर्धशतके
पहिल्यांदा फलंदाजी करताना गुजरात टायटन्सच्या सलामी जोडीनं आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील दमदार भागीदारी रचली. साई सुदर्शन आणि शुबमन गिल जोडीनं पहिल्या विकेटसाठी ९३ धावांची भागीदारी रचत संघाला दमदार सुरुवात करून दिली. साई ३० चेंडूत ३९ धावा करून परतल्यावर शुबमन गिलनं ५० चेंडूत ८४ धावांची खेळी केली. याशिवाय जोस बटलरनं २६ चेंडूत यंदाच्या हंगामातील चौथे अर्धशतक झळकावले. वॉशिंग्टन सुंदरनं ८ चेंडूत केलेल्या १३ धावा आणि राहुल तेवतिया ९(४) आणि शाहुरुख खानच्या नाबाद ५ धावांच्या खेळीसह गुजरात टायटन्सच्या संघाने निर्धारित २० षटकात धावफलकावर २०९ धावा लावल्या होत्या. राजस्थानकडून महीश तीक्षणा याने सर्वाधिक दोन विकेट्स घेतल्या तर जोफ्रा आर्चर आणि संदीप शर्मा यांनी प्रत्येकी एक-एक बळी आपल्या खात्यात जमा केला.
Web Title: IPL 2025 RR vs GT Rajasthan Royals thrashes Gujarat Titans by eight wickets Vaibhav Suryavanshi Stars With Century Yashasvi Jaiswal Not Fifty
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.