IPL 2025 PBKS vs RCB Shreyas Iyer And Rajat Patidar : आयपीएलच्या १८ व्या हंगामात पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या दोन संघांमध्ये जेतेपदाची लढत रंगणार आहे. ३ जूनला जगातील सर्वात मोठ्या अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर लोकप्रिय टी-२० लीगमध्ये नवा विजेता मिळेल. पंजाब किंग्जचे नेतृत्व हे श्रेयस अय्यरच्या खांद्यावर आहे. दुसरीकडे रजत पाटीदार रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला सुवर्ण क्षण दाखवून देण्यासाठी मैदानात उतरेल. दोन्ही संघ पहिल्यांदा जेतेपदासाठी भिडत असले तरी दोन कॅप्टन मात्र दुसऱ्यांदा समोरासमोर येणार आहेत. जाणून घेऊयात दोघांमध्ये जुळून आलेला कमालीचा योगायोग आणि याआधी कोण कुणावर पडलं होतं भारी यासंदर्भातील खास स्टोरी
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
कोण होणार नवा चॅम्पियन?
आयपीएल स्पर्धेत आतापर्यंत पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची पाटी कोरीच आहे. दोन्ही संघ पहिल्या हंगामापासून या स्पर्धेत खेळत आहेत. आता अय्यर प्रीती झिंटाच्या संघाचे चॅम्पियन करण्याचे स्वप्न साकार करणार की, १८ व्या हंगामात रजत पाटीदार १७ हंगामात १८ क्रमांकाच्या जर्सीत रुबाबात वावरणाऱ्या विराट कोहलीच्या संघाचा दुष्काळ संपवणार ते पाहण्याजोगे असेल.
तीन वेगवेगळ्या संघांना आयपीएल फायनलमध्ये नेणाऱ्या श्रेयस अय्यरचे घर पाहिले का...?
७ महिन्यानंतर संघ बदलून अय्यर-पाटीदार एकमेकांविरुद्ध भिडणार
याआधी २०२४ च्या हंगामात सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत दोन्ही कॅप्टन समोरासमोर आले होते. देशांतर्गत क्रिकेटमधील प्रतिष्ठित स्पर्धेत श्रेयस अय्यर हा मुंबई संघाचे नेतृत्व करताना दिसला होता. दुसरीकडे रजत पाटीदार मध्य प्रदेश संघाचा कर्णधार होता. अंतिम सामन्यात श्रेयस अय्यरच्या संघाने बाजी मारली होती. मुंबईच्या संघाने मध्य प्रदेशच्या संघाला पाच विकेट्स राखून पराभूत करत ही स्पर्धा जिंकली होती.
प्लेऑफ्समध्ये कोण कुणावर ठरलं भारी?
आयपीएलच्या यंदाच्या हंगामात पहिल्या क्वालिफायरमध्ये श्रेयस अय्यरच्या पंजाब संघावर रजत पाटीदारचा आरसीबी संघ भारी ठरला होता. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने एकतर्फी विजय मिळवत थेट फायनल गाठली. पंजाबच्या संघाने दुसऱ्या क्वालिफायर लढतीत पाच वेळच्या चॅम्पियन मुंबईला पराभूत करत फायनलचा डाव साधलाय.
Web Title: IPL 2025 PBKS vs RCB Final What Happened When Last Time Shreyas Iyer And Rajat Patidar Met In The Final
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.