IPL 2025 PBKS vs MI Qualifier 2 :अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यातील क्वॉलिफायर २ ची लढत रंगली आहे. या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांनी केलेल्या क्लास खेळीनंतर नमन धीरचा जलवा पाहायला मिळाला. अखेरच्या टप्प्यात त्याने केलेल्या फटकेबाजीच्या जारोवर मुंबई इंडियन्सच्या संघाने क्वालिफायर २ ची लढाई २०० पारची केली. निर्धारित २० षटकात २०१३ धावा करत मुंबई इंडियन्सच्या संघाने पंजाबसमोर २०४ धावांचे टार्गेट सेट केले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
बुमराहची धुलाई करत जॉश इंग्लिसनं वाढवलं होतं MI चं टेन्शन
या धावसंख्येचा पाठलाग करताना पंजाब किंग्जची सुरुवात खराब झाली. बोल्टनं १३ धावांवर संघाला पहिला धक्का दिला. प्रभसिमरन सिंग स्वस्तात तंबूत परतल्यावर त्याची जागा घेण्यासाठी आलेल्या जॉश इंग्लिसने तुफान फटकेबाजी केली. जसप्रीत बुमराहच्या पहिल्या षटकात त्याने २० धावा कुटतं मुंबई इंडियन्सचे टेन्शनच वाढवले होते. दुसऱ्या बाजूला प्रियंश आर्या त्याला उत्तम साथ देत होता. अश्वनी कुमारनं आपल्या पहिल्याच षटकात प्रियंशला आपल्या जाळ्यात अडकवले. अन् मग तुफान फटकेबाजीच्या मूडमध्ये असलेला जॉश इंग्लिस कॅप्टन हार्दिक पांड्याच्या गळाला लागला. त्याची विकेट सध्या चर्चेचा विषय़ ठरत असून या विकेटनंतर मैदानातील पंच नितीन मेनन चर्चेत आले आहेत. काय आहे त्यामागचं कारण जाणून घेऊया सविस्तर ....
IPL मध्ये सूर्यकुमार यादवचा मोठा पराक्रम! एबी डिव्हिलियर्सच्या विक्रम मोडीत काढत रचला नवा इतिहास
अपील करायच्या आधीच अंपायनं दिली विकेट, मग...
पंजाब किंग्जच्या डावातील आठव्या षटकात हार्दिक पांड्या गोलंदाजीला आला. या षटकातील पाचव्या चेंडूवर आखूड टप्प्याच्या चेंडूवर पांड्याने जॉश इंग्लिसला चकवा दिला. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला की, नाही याबद्दल ना हार्दिक पांड्याला खात्री होती ना जॉनी बेअरस्टोला विकेट्स मिळाल्याच्या खात्री होती. पण पंच नितीन मेननं यांनी हातवर करत जॉश इंग्लिसला बाद ठरवले. क्षणाचाही विलंब न करत जॉश इंग्लिसनं रिव्हू घेतला. पण स्निकोमध्ये बॅट अन् बॉलचा किंचित संपर्क झाल्याचे स्पष्ट झाले अन् पंचाचा निर्णय कायम राहिला. तो आउट होता ते रिप्लेमध्ये दिसून आले. पण पंचांना या विकेटची एवढी घाई का होती? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. पांड्यानं अपील करण्याआधीच पंचांनी विकेट दिली त्यामुळे सोशल मीडियावर अपांयर नितीन मेनन यांचे नाव ट्रेंडमध्ये दिसून येत आहे.
Web Title: IPL 2025 PBKS vs MI Qualifier 2 Umpire Nitin Menon Raised His Finger Even Before Hardik Pandya Made An Appeal Against Josh Inglis
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.