PBKS vs MI : रोहितचा कॅच सुटल्यावर अय्यरचा मास्टर स्ट्रोक! स्टॉयनिसनं तर छाती बडवत केलं सेलिब्रेशन

क्वालिफायर २ च्या लढतीत रोहित शर्मा दुहेरी आकडाही गाछू शकला नाही.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2025 22:51 IST2025-06-01T22:46:01+5:302025-06-01T22:51:36+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2025, PBKS vs MI Qualifier 2, Marcus Stoinis vs Rohit Sharma An Aggressive Send Off Watch Video | PBKS vs MI : रोहितचा कॅच सुटल्यावर अय्यरचा मास्टर स्ट्रोक! स्टॉयनिसनं तर छाती बडवत केलं सेलिब्रेशन

PBKS vs MI : रोहितचा कॅच सुटल्यावर अय्यरचा मास्टर स्ट्रोक! स्टॉयनिसनं तर छाती बडवत केलं सेलिब्रेशन

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2025 PBKS vs MI Qualifier 2 Marcus Stoinis vs Rohit Sharma : मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात यंदाच्या हंगामातील क्वालिफायर २ ची लढत अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगल्याचे पाहायला मिळाले. पावसाच्या व्यत्ययामुळे उशीराने सुरु झालेल्या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना रोहित शर्मा आणि जॉनी बेअरस्टो जोडीनं संयमी सुरुवात केली.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

पुन्हा रोहितचा कॅच सुटला; पण यावेळी तो जास्त काळ नाही टिकला

या मॅचमध्येही दुसऱ्याच षटकात रोहित शर्माला एक जीवनदान मिळाले. जेमिसन घेऊन आलेल्या दुसऱ्या षटकातील पाचव्या चेंडूवर अझमतुल्लाह ओमरझाईनं त्याचा कॅच सोडला. पण रोहित शर्मा एलिमिनेटर लढती प्रमाणे मिळालेल्या संधीचं सोनं करू शकला नाही. हा कॅच सुटल्यावर पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यरनं एक मास्टर स्ट्रोक खेळला. अन् त्यात रोहित शर्मा फसला. त्याची विकेट मिळाल्यावर स्टॉयनिसनं अक्षरश: छाती बडवून आक्रमक अंदाजात सेलिब्रेशन केल्याचे पाहायला मिळाले. रोहित शर्मानं ७ चेंडूत ८ धावा करून तंबूचा रस्ता धरला.

Shreyas Iyer: मुंबईविरुद्ध श्रेयस अय्यरकडे इतिहास रचण्याची संधी, आतापर्यंत कोणालाही जमलं नाही असं!

मार्कस स्टॉयनिसनं छाती बडवत व्यक्त केला विकेटचा आनंद

 

पहिल्या दोन षटकानंतर श्रेयस अय्यरनं अष्टपैलू मार्कस स्टॉयनिस याच्या हाती चेंडू सोपवला. त्याने घेतलेला हा निर्णय अनेकांना आश्चर्यचकित करणारा होता. कारण प्रमुख गोलंदाजांना बाजूला ठेवून त्याने तिसऱ्याच षटकात स्टॉयनिसवर भरवसा दाखवला. या हंगामात स्टॉयनिसने अधिक गोलंदाजीही केलेली नाही. पहिल्याच चेंडूवर रोहित शर्मानं त्याला खणखणीत चौकार मारला अन् आपले इरादे स्पष्ट केले. पण दुसऱ्या चेंडुवर पुल शॉट मारण्याच्या नादात तो फसला. विजयकुमार वैशकनं कोणतीही चूक न करता रोहितचा कॅच पकडला अन् पंजाबच्या संघाला पहिले यश मिळाले. मुंबई इंडियन्सला मोठा धक्का दिल्यावर मार्कस स्टॉयनिसनं आक्रमक अंदाजात सेलिब्रेशन केले. तो छाती बडवत रोहितच्या विकेटचं सेलिब्रेशन करताना पाहायला मिळाले. पहिल्या चेंडूवर चौकाराने स्वागत केल्याचा रागच तो काढताना दिसला. ही विकेट त्याच्यासह पंजाबसाठीही मोठी होती. हे स्टॉयनिसच्या सेलिब्रेशनमध्ये दिसून येत होते. 

Web Title: IPL 2025, PBKS vs MI Qualifier 2, Marcus Stoinis vs Rohit Sharma An Aggressive Send Off Watch Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.