IPL 2025 CSK Sign Dewald Brevis : आयपीएल २०२५ च्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जचा संघ संघर्ष करताना दिसतोय. स्पर्धेतील आव्हान टिकवून ठेवण्यासाठी चेन्नई संघासाठी आता प्रत्येक सामना महत्त्वाचा आहे. दरम्यान कॅप्टन्सीतील बदलानंतर आता CSK च्या संघात एक मोठा बदल झाला आहे. मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातून खेळताना दिसलेला स्फोटक फलंदाज डेवाल्ड ब्रेविस याला चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने आपल्या संघात सामील करून घेतले आहे. गुरजपनीत सिंग याच्या इंज्युरी रिप्लेसमेंटच्या रुपात CSK नं दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटरवर २.२ कोटींसह मोठा डाव खेळला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
स्फोटक फलंदाजीसह सोडलीये खास छाप
ब्रेविस हा चेन्नई सुपर किंग्जच्या संघासाठी फायद्याचा सौदा ठरू शकतो. आंतरराष्ट्रीय स्तरावर दक्षिण आफ्रिकेच्या संघातून त्याला फारशी संधी मिळालेली नाही. पण या खेळाडूमध्ये स्फोटक फटकेबाजीसह सामन्याला कलाटणी देण्याची क्षमता आहे. त्याच्या भात्यातून एबी डिव्हिलियर्सच्या धाटणीतील फटकेबाजी पाहायला मिळते. यामुळेच त्याला बेबी एबी या नावानेही ओळखले जाते. यंदाच्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने ७ पैकी फक्त २ सामन्यात विजय मिळवला आहे. उर्वरित ७ पैकी किमान ६ सामने जिंकण्याचे चॅलेंज त्यांच्यासमोर आहे. मुंबई इंडियन्स विरुद्धच्या महत्त्वपूर्ण लढतीआधी संघाने ब्रेविसवर खेळल्याचे दिसते.
IPL ची आजच झाली होती सुरुवात! फक्त ४ क्रिकेटपटू खेळू शकलेत सर्व १८ सीझन, पाहा यादी
मुंबई इंडियन्सकडून अशी राहिलीये त्याची कामगिरी
आयपीएलमध्ये CSK च्या ताफ्यातून मैदानात उतरण्याआधी तो मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसला आहे. मुंबई इंडियन्सच्या संघाकडून तो १० सामने खेळताना त्याने २३० धावा केल्या आहेत. ४९ ही त्याची आयपीएलमधील सर्वोच्च धावसंख्या आहे. यंदाच्या हंगामात तो आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा भाग नसला तरी दक्षिण आफ्रिकेतील टी२० लीगमध्ये तो मुंबई इंडियन्स फ्रँचायझी संघातून खेळताना दिसते.
डेवाल्ड ब्रेविसची टी२० कारकिर्द
२१ वर्षीय ब्रेविसने आतापर्यंत ८१ टी२० सामने खेळले आहेत. २६.२७ च्या सरासरीसह ११४ पेक्षा अधिकच्या स्ट्राइक रेटनं त्याने १७८७ धावा काढल्या आहेत. टी-२० क्रिकेटमध्ये त्याच्या नावे एका शतकासह ७ अर्धशतकांची नोंद आहे. गोलंदाजी वेळी त्याने १८ विकेट्सही घेतल्या आहेत.
Web Title: IPL 2025 MS Dhoni Lead CSK Sign Former MI Batter Dewald Brevis For Remaining Games As Gurjapneet Singh Replacement
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.