Rohit Sharma Troubled Against Left Arm Pacers मुंबईचा 'राजा' रोहित शर्मा वानखेडेच्या मैदानात पुन्हा एकदा आपल्या भात्यातील फटकेबाजीचा खास नजराणा पेश करत मुंबई इंडियन्सच्या संघाला दमदार सुरुवात करून देईल अशी अपेक्षा होती. पण नेहरा अँण्ड गिलच्या गुजरात टायटन्सनं त्याच्याविरुद्ध एकदम परफेक्ट डाव खेळला अन् तो त्यांनी टाकलेल्या जाळ्यात अडकला. रोहित शर्मा पॉवर प्लेमध्येच ७ धावा करून तंबूत परतला. त्याने अनकॅप्ड अर्शद खान (Arshad Khan) च्या गोलंदाजीवर झेलबादच्या रुपात विकेट फेकली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
...अन् रोहित शर्मा त्याच्या जाळ्यात फसला
अर्शद खानच्या बॅक ऑफ लेंथ चेंडूवर मिडऑफच्या वरुन फटका खेळण्याचा रोहित शर्माचा प्रयत्न फसला अन् प्रसिद्ध कृष्णानं कोणतीही चूक न करता त्याचा सोपा झेल टिपला. अर्शद खानची पाचव्या सामन्यातील त्याची ही तिसरी विकेट ठरली. आयपीएलच्या यंदाच्या हंगामात अर्शद खानने विराट कोहलीच्या रुपात आपली पहिली विकेट घेतली होती. गोलंदाजीत तो फारसा प्रभावी ठरलेला नसताना आशिष नेहरा आणि शुबमन गिल जोडीनं खास रोहित शर्माला जाळ्यात अडकवण्यासाठी वॉशिंग्टन सुंदरच्या जागी त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली अन् हा डाव यशस्वीही ठरला.
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
डावखुऱ्या जलगती गोलंदाजांसमोर असा आहे रोहितचा रेकॉर्ड
रोहित शर्मा हा आपल्या तुफान फटकेबाजीसाठी ओळखला जातो. पण टी-२० क्रिकेटमध्ये सातत्याने लेफ्ट आर्म पेसर समोर तो हतबल ठरल्याचे पाहायला मिळाले आहे. आपल्या टी-२० कारकिर्दीत ११५ सामन्यात रोहित शर्मानं ३५ वेळा डावखुऱ्या जलदगती गोलंदाजासमोर आपली विकेट फेकली आहे. यादरम्यान रोहित शर्मानं २३.१ च्या सरासरीसह १३६.५ च्या स्ट्राइक रेटसह धावा करताना ३७ षटकार मारल्याचा रेकॉर्ड आहे. क्रिकबझनुसार, २०२३ पासून टी-२० क्रिकेटमध्ये १२ वेळा डावखुऱ्या जलदगती गोलंदाजाने रोहित शर्माला पॉवर प्लेमध्ये तंबूचा रस्ता दाखवला आहे. यादरम्यान त्याचे स्ट्राइक रेट १४७.२५ इतके राहिले आहे.
रोहित शर्माला दमवणारे लेफ्ट आर्म पेसर
रोहित शर्माला दमवणाऱ्या गोलंदाजांमध्ये ट्रेंट बोल्ट, जेन्स फॉकनर, आणि जयदेव उनादकट, खलील अहमद आणि यश दयालसह या यादीत आता अर्शद खानचाही समावेश झालाय. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातून खेळताना दिसणाऱ्या ट्रेंट बोल्टनं रोहितला सर्वाधिक ६ वेळा वेळा आउट केले आहे.
Web Title: IPL 2025 MI vs GT Left Arm Pacers Weakness For Rohit Sharma Now Uncapped Arshad Khan Dismissed Him See Hitman Poor Record
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.