MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...

दुसऱ्या स्पेलमध्ये बुमराहनं दाखवले तेवर, दोन षटकात घेतल्या दोन विकेट्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 23:48 IST2025-05-06T23:33:08+5:302025-05-06T23:48:13+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2025 MI vs GT Jasprit Bumrah Has Got The Big Wicket Of Shubman Gill Tight After Rain Break | MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...

MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामन्यात जसप्रीत बुमराहनं मोक्याच्या क्षणी सेट झालेल्या शुबमन गिलची महत्त्वपूर्ण विकेट घेतली. पहिल्या स्पेलमधील दोन षटकात जसप्रीत बुमराहनं अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली. शुबमन गिलनंही त्याच्या गोलंदाजीला सन्मान देत सावध खेळण्याला पसंती दिली. पावसामुळे खेळ थांबल्यावर पुन्हा खेळ सुरु झाल्यावर दुसऱ्या स्पेलमधील पहिल्या षटकात बुमराह पुन्हा गोलंदाजीला आला. या षटकात गिलनं त्याला एक चौकार मारला.  या षटकात एका अप्रतिम स्विंगवर बुमराहनं गिलच्या खेळीला ब्रेक लावला. या विकेटमुळे गुजरातच्या बाजूनं सेट झालेला सामना पुन्हा मुंबई इंडियन्सच्या बाजूनं झुकला. अखेरच्या षटकातही बुमराहनं शाहरुख खानची विकेट घेत सामन्यात ट्विस्ट आणले. 

  'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

पहिल्या दोन षटकातही बुमराहनं जबरदस्त गोलंदाजी केली, पण...

जसप्रीत बुमराहनं आपल्या पहिल्या षटकात फक्त ४ धावा खर्च केल्या होत्या. यात त्याने वाइडच्या रुपात एक अवांतर धाव खर्च केली होती. दुसऱ्या षटकात त्याने फक्त दोन धावा दिल्या. पण त्याच्या हाती काही विकेट लागली नव्हती. १४ व्या षटकानंतर पावासामुळे खेळ थांबला त्यावेळी शुबमन गिल ४२ चेंडूत ३८ धावांवर खेळत होता.  सामना पुन्हा सुरु झाला त्यावेळी GT ला  ३६ चेंडूत ४९ धावांची गरज होती.  

दोन षटकात दोन विकेट्स

बुमराहच्या उर्वरित दोन षटके हीच मुंबईची आस होती. बुमराहनंही  निराश केले नाही. १५ व्या षटकात पहिला चेंडू निर्धाव टाकल्यावर शुबमन गिलनं त्याच्या गोलंदाजीवर एक चौकार मारला. पण याच षटकातील पाचव्या चेंडूवर बुमराहाने त्याची विकेट घेतली. ही विकेट मॅचला टर्निंग पाइंट देणारी होती. एवढ्यावरच बुमराह थांबला नाही. त्याने दुसऱ्या षटकात मोठी फटकेबाजी करण्याची क्षमता असलेल्या शाहरुख खानलाही क्लीन बोल्ड केले. बुमराने बॅक टू बॅकमध्ये घेतलेल्या विकेटसह सामन्यात नवे ट्विस्ट आणले. बुमराहनं आपल्या ४ षटकांच्या कोट्यात १९ धावा खर्च करून मोक्याच्या क्षणी दोन महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या.

Web Title: IPL 2025 MI vs GT Jasprit Bumrah Has Got The Big Wicket Of Shubman Gill Tight After Rain Break

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.