आयपीएलच्या १८ व्या हंगामातून प्लेऑफ्सच्या शर्यतीबाहेर पडलेल्या सनरायझर्स हैदराबादच्या संघाने लखनौच्या मैदानात रंगलेली २०० पारची लढाई जिंकत लखनौ सुपर जाएंट्सलाही आपल्या पक्तींत बसवले आहे. या सामन्याआधी लखनौचा संघ प्लेऑफ्सच्या शर्यतीत होता. पण घरच्या मैदानातील पराभवासह लखनौच्या उरल्या सुरल्या आशा संपुष्टात आल्या आहेत. लखनौचा संघ यंदाच्या हंगामातून प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट होणारा पाचवा संघ ठरला आहे. या निकालानंतर आता प्लेऑफ्सच्या एका जागेसाठी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात चुरस पाहायला मिळणार आहे. गुजरात टायटन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि पंजाब किंग्ज यांच्यानंतर चौथा संघ कोण हे चित्र २१ तारखेला स्पष्ट होईल.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
LSG च्या सलामीवीरांसह निकोलास पूरनचा हिट शो!
लखनौच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात नाणेफेक जिंकून पॅट कमिन्स याने पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मिचेल मार्श ६५ (३९) आणि एडन मार्करम ६१ (३८) या सलामी जोडीच्या अर्धशतकानंतर निकोलस पूरन याने २६ चेंडूत केलेल्या ४५ धावांच्या खेळीच्या जोरावर लखनौच्या संघाने निर्धारित २० षटकात ७ विकेट्सच्या मोबदल्यात २०५ धावा करत हैदराबादसमोर २०६ धावांचे टार्गेट सेट केले होते.
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
धावांचा पाठलाग करताना आधी अभिषेक शर्माचा जलवा, मग क्लासेनही दाखवला क्लास
लखनौनं दिलेल्या धावांचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबादची सुरुवात खराब झाली. अथर्व तायडे ९ चेंडूत १३ धावा करून तंबूत परतला. पण त्यानंतर अभिषेक शर्मा आणि इशान किशन ही जोडी जमली. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ९९ धावांची भागीदारी केली. अभिषेक शर्मा २० चेंडूत ५९ धावांच्या खेळीसह सामना सेट करून माघारी फिरला. इशान किशन याने २८ चेंडूत उपयुक्त अशी ३५ धावांची खेळी केली. त्यानंतर हेन्रिच क्लासेन आणि कामिंदू मेंडिस या जोडीनं सनरायझर्स हैदराबादच्या संघाला विजयाच्या जवळ नेले. विजय दृष्टिक्षेपात असताना क्लासेन २८ चेंडूत ४७ धावा करून माघारी फिरला. कानिंदू मेंडिस ३२ धावांवर रिटायर्ड हर्टच्या स्वरुपात तंबूत परतल्यावर अनिकेत वर्मा आणि नितेश कुमार रेड्डी या जोडीनं हैदराबादच्या विजय पक्का केला. हैदराबादच्या संघाने ६ विकेट्सने सामना जिंकताच लखनौचा स्पर्धेतील प्रवास संपुष्टात आला.
Web Title: IPL 2025 LSG vs SRH Sunrisers Hyderabad won by 6 wkts Lucknow Super Giants are OUT of the playoffs race in IPL 2025 Now MI And DC Two Team Race In 1 Place
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.