IPL 2025 Eliminator Match GT vs MI onny Bairstow Blast Powerplay : आयपीएलच्या १८ व्या हंगामातील एलिमिनेटरच्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या संघाने जॉनी बेअरस्टोवर खेळलेला डाव एकदम परफेक्ट ठरला आहे. गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात रोहितच्या साथीनं मुंबई इंडियन्सच्या डावाची सुरुवात करताना त्याने आपल्यातील स्फोटक फलंदाजीची झलक दाखवली. मुंबई इंडियन्सच्या डावातील चौथ्या षटकात पर्पल कॅप होल्डर प्रसिद्ध कृष्णाच्या गोलंदाजीवर जॉनी बेअरस्टोनं षटकार चौकारांची बरसात करत २६ धावा कुटल्या. त्याच्या दमदार खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सच्या संघाने पावरप्लेमध्ये ७९ धावा केल्याचे पाहायला मिळाले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
MI कडून पदार्पणाच्या सामन्यात बेअरस्टोची बेस्ट इनिंग
रायन रिकल्टनच्या जागी बदली खेळाडूच्या रुपात मुंबई इंडियन्सच्या संघाने जॉनी बेअरस्टोवर तब्बल सव्वा पाच कोटी लावले होते. तीन वर्षांनी आयपीएलमध्ये कमबॅक करताना त्याने आपल्या भात्यातील तुफान फटकेबाजीचा नजराणा पेश करत पैसा वसूल कामगिरी करून दाखवली. मुंबई इंडियन्सकडून पदार्पणाच्या सामन्यात तो अगदी अर्धशतकाच्या जवळ पोहचला होता. पण ४७ धावांवर साई किशोरच्या गोलंदाजीवर उलटा फटका (रिव्हर्स शॉट्स) मारण्याच्या नादात त्याने विकेट गमावली. विकेट गमावण्याआधी बेअरस्टोनं संघासाठी उपयुक्त खेळी केली होती. त्याने २२ चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकाराच्या मदतीने २१३ .६४ च्या स्ट्राइक रेटनं ४७ धावा कुटल्या.
Web Title: IPL 2025 Eliminator Match GT vs MI Jonny Bairstow Mis Fifty But Blast In Powerplay He takes Prasidh Krishna for 26 runs In One Over
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.