आधी कॅच घेताना गडबडला; बॅटिंग करताना Hit Wicket झाला! मग नेटकऱ्यांमध्ये रंगली मॅच 'फिक्सिंग'ची चर्चा

गुजरात टायटन्सनं ज्याच्यावर भरवसा दाखवला त्याने फिल्डिंग अन् बॅटिंग दोन्ही क्षेत्रात संघाला अडचणीत आणले. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 23:26 IST2025-05-30T23:19:01+5:302025-05-30T23:26:46+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2025 Eliminator GT Paid Good But MI Paid Him Better Kusal Mendis Troll On Social Media After Dropped Multiple Catches And Hit His Own Wickets | आधी कॅच घेताना गडबडला; बॅटिंग करताना Hit Wicket झाला! मग नेटकऱ्यांमध्ये रंगली मॅच 'फिक्सिंग'ची चर्चा

आधी कॅच घेताना गडबडला; बॅटिंग करताना Hit Wicket झाला! मग नेटकऱ्यांमध्ये रंगली मॅच 'फिक्सिंग'ची चर्चा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

 Gujarat Titans vs Mumbai Indians, Eliminator  Kusal Mendis Troll On Social Media Afrer Hit Wicket  :  गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात आयपीएलच्या १८ व्या हंगामातील एलिमिनेटरचा सामना रंगल्याचे पाहायला मिळाले. या सामन्यात दोन्ही संघ काही मोठ्या बदलासह मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले. मुंबई इंडियन्सच्या संघाकडून रायन रिकल्टनच्या जागी जॉनी बेअरस्टोला पदार्पणाची संधी मिळाली. दुसऱ्या बाजूला गुजरातच्या संघाकडून जोस बटलच्या जागी श्रीलंकेचा कुशल मेडिंसला संघात स्थान मिळाले. मुंबई इंडियन्सचा बदली खेळाडूचा डाव परफेक्ट ठरला. मग गुजरात टायटन्सनं ज्याच्यावर भरवसा दाखवला त्याने फिल्डिंग अन् बॅटिंग दोन्ही क्षेत्रात संघाला अडचणीत आणले. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

आधी झेल सोडले 

MI vs GT
MI vs GT

पहिल्यांदा फिल्डिंग करताना मेंडिसनं विकेटमागे रोहित शर्माच्या झेल सोडून त्याला मोठी खेळी करण्याची संधी दिली. याशिवाय त्याने एकूण तीन कॅच सोडले. मुंबई इंडियन्सच्या संघाने एलिमिनेटरच्या लढतीत गुजरात टायटन्ससमोर मोठी धावसंख्या उभारली. ढिसाळ क्षेत्ररक्षणासह मेंडिसने मुंबई इंडियन्सला हातभारच लागला. 

MI vs GT : हार्दिक पांड्याची कडक फटकेबाजी; त्याच्या षटकारानंतर लक्षवेधी ठरली ही सुंदरी (VIDEO)

मग बॅटिंग वेळी हिट विकेट होऊन तंबूत परतला

MI vs GT
MI vs GT

आयपीएलमध्ये पहिला सामना खेळताना फिल्डिंगमध्ये घोळ घातल्यावर बॅटिंगमध्ये धमक दाखवून जे चुकलं ते भरून काढण्याची त्याच्याकडे संधी होती. तो आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. शुबमन गिल स्वस्तात माघारी फिरल्यावर तिसऱ्या क्रमांकावर मेंडिस फलंदाजीला आला. २०० च्या स्ट्राइक रेटनं त्याने १० चेंडूत २० धावा करत आपल्या भात्यातील फटकेबाजीची क्षमताही दाखवली. पण गुजरातच्या डावातील सातव्या षटकात मिचेल सँटनरच्या गोलंदाजीवर त्याने हिट विकेटच्या स्वरुपात तो तंबूत माघारी फिरला. आपल्या अल्प खेळीत त्याने १ चौकार आणि २ षटकार मारले.

नेटकऱ्यांमध्ये रंगली भलतीच चर्चा

MI vs GT
MI vs GT

फिल्डिंग आणि बॅटिंगमधील त्याचा तोरा बघून सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केल्याचे पाहायला मिळाले. त्याचा बँक बॅलन्स नक्कीच वाढला असेल. गुजरात टायटन्सने त्याला चांगले पैसे दिलेत, पण दुसऱ्या पार्टीकडून त्याला यापेक्षा मोठी रक्कम मिळाल्याचे दिसते. याला जिओतून मोठी ऑफर आलीये वाटतं. अशा मजेशीर कमेंटसह नेटकरी तो मुंबईच्या बाजूनं खेळलाय असा आरोपच केल्याचे दिसून येते.   

Web Title: IPL 2025 Eliminator GT Paid Good But MI Paid Him Better Kusal Mendis Troll On Social Media After Dropped Multiple Catches And Hit His Own Wickets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.