IPL 2021 : मॅक्सवेलवरून RCB आणि KXIP मध्ये धमासान, बंगळुरूच्या ट्विटला पंजाबकडून सणसणीत प्रत्युत्तर

Glenn Maxwell News : बंगळुरूकडून प्रथमच खेळणाऱ्या ग्लेन मॅक्सवेलने तुफानी फलंदाजी केली. त्यावे २८ चेंडून ३ चौकार आणि २ षटकारांसह ३९ धावा कुटल्या. दरम्यान मॅक्सवेलच्या खेळीनंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि किंग्स इलेव्हन पंजाबमध्ये जोरदार जुगलबंदी रंगली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2021 01:59 PM2021-04-10T13:59:49+5:302021-04-10T14:03:40+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021: Tweeter war in RCB and KXIP on Glenn Maxwell, Kings XI Punjab responds to Royal Challengers Bangalore tweet's | IPL 2021 : मॅक्सवेलवरून RCB आणि KXIP मध्ये धमासान, बंगळुरूच्या ट्विटला पंजाबकडून सणसणीत प्रत्युत्तर

IPL 2021 : मॅक्सवेलवरून RCB आणि KXIP मध्ये धमासान, बंगळुरूच्या ट्विटला पंजाबकडून सणसणीत प्रत्युत्तर

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

चेन्नई  - आयपीएलमध्ये शुक्रवारी झालेल्या सलामीच्या लढतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (Royal Challengers Bangalore) गतविजेत्या मुंबई इंडियन्सवर  (Kings XI Punjab) दोन विकेट्सनी मात केली होती. या लढतीत बंगळुरूकडून प्रथमच खेळणाऱ्या ग्लेन मॅक्सवेलने ( Glenn Maxwell) तुफानी फलंदाजी केली. त्यावे २८ चेंडून ३ चौकार आणि २ षटकारांसह ३९ धावा कुटल्या. दरम्यान मॅक्सवेलच्या खेळीनंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि किंग्स इलेव्हन पंजाबमध्ये जोरदार जुगलबंदी रंगली आहे. (Tweeter war in RCB and KXIP on Glenn Maxwell, Kings XI Punjab responds to Royal Challengers Bangalore tweet's )

गेल्या आयपीएलमध्ये खराब फॉर्मशी झुंजत असलेल्या मॅक्सवेलला किंग्स इलेव्हन पंजाबने संघातून रिलिज केले होते. त्यानंतर लिलावामध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मॅक्सवेलला मोठी रक्कम मोजून खरेदी केले होते. दरम्यान, पहिल्याच सामन्यात मॅक्सवेलने जोरदार आतिषबाजी करत आपली निवड सार्थ ठरवली आहे. त्यानंतर रॉयस चॅलेंजर्स बंगळुरूने ट्विट करत किंग्स इलेव्हन पंजाबला डिवचले. या ट्विटमध्ये आरसीबीने म्हटले की, मॅक्सवेलने संघात येताच पहिला षटकार चेंडू थेट चेन्नईबाहेर भिरकावत मारला. धन्यवाद किंग्स इलेव्हन पंजाब, जर सोशल डिस्टंसिंग नसेल तर आम्ही तुम्हाला आलिंगण देऊ इच्छितो. 

त्यानंतर या ट्विटला किंग्स इलेव्हन पंजाबनेही तितकेच जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. त्यात पंजाबच्या संघव्यवस्थापनाने म्हटले की, आम्हीही ख्रिस गेल, केएल राहुल, मयांक अग्रवाल, सर्फराझ यांच्यासाठी तुमचे आभार मानतो. 

दरम्यान, आयपीएल २०२१ मध्ये काल मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूमध्ये झालेल्या सलामीच्या लढतीत मुंबईने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांमध्ये ९ बाद १५९ धावा बनवून बंगळुरूसमोर १६० धावांचे आव्हान ठेवले होते. बंगळुरूच्या हर्षल पटेलने २७ धावा देत ५ बळी टिपले होते. दरम्यान, एबी डिव्हिलियर्सने केलेल्या तुफानी फटकेबाजीच्या जोरावर बंगळुरूने हा सामना दोन विकेट्स राखून जिंकला. 

Web Title: IPL 2021: Tweeter war in RCB and KXIP on Glenn Maxwell, Kings XI Punjab responds to Royal Challengers Bangalore tweet's

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.