IPL 2021 to start on April 9, final on May 30 subject to GC approval | IPL 2021 Date : WTC Finalमुळे आयपीएलचा अंतिम सामना लवकर घेणार, ९ एप्रिलपासून स्पर्धा सुरू होणार 

IPL 2021 Date : WTC Finalमुळे आयपीएलचा अंतिम सामना लवकर घेणार, ९ एप्रिलपासून स्पर्धा सुरू होणार 

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2021) १४व्या पर्वाला ९ एप्रिलपासून सुरू होणार आहे आणि अंतिम सामना ३० मे रोजी खेळवण्यात येणार असल्याचे वृत्त ANIनं दिलं आहे. गव्हर्निंग काऊंसिलच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब होऊन लवकरच घोषणा केली जाईल. गतवर्षी आयपीएल यूएईत खेळवण्यात आली होती आणि मुंबई इंडियन्सनं विक्रमी पाचवे जेतेपद नावावर केलं होतं. पण, यंदाची आयपीएल भारतात खेळवण्यात येईल, हे जवळपास निश्चित आहे. आठ फ्रँचायझींनी ५७ खेळाडूंसाठी मोजले १४५.३० कोटी; एका क्लिकवर समजून घ्या हे गणित!

शरद पवारांची भेट अन् मुंबईत सामने खेळवण्याचा मार्ग मोकळा
आयपीएल चेअरमन ब्रिजेश पटेल, बीसीसीआयचे सीईओ हेमांग आमीन आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या काही सदस्यांनी बुधवारी BCCIचे माजी अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar) यांची भेट घेतली. इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2021) १४व्या पर्वातील सामन्यांचे मुंबईत आयोजन करण्यात परवानगी मिळावी, यासाठी ही भेट घेण्यात आली होती. त्या बैठकीत पवारांनी आयपीएल प्रतिनिधींना महाराष्ट्र सरकारकडून शक्य ती सर्व मदत मिळेल, असे आश्वासन दिले.   आयपीएलचे सामने मुंबईत होणार; IPL चेअरमन अन् BCCI सदस्यांनी घेतली शरद पवारांची भेट अन्... 

सहा शहरांची निवड, परंतु हैदराबाद, जयपूर आणि मोहाली यांचा विरोध लिलावाची सांगता, जाणून घ्या ८ फ्रँचायझींच्या खेळाडूंची संपूर्ण यादी!
बीसीसीआयनं आयपीएल आयोजनासाठी कोलकाता, अहमदाबाद, चेन्नई, बंगळुरू, दिल्ली यांच्यासह मुंबईची निवड केली आहे. हैदराबाद, जयपूर आणि मोहाली या शहरांचा आयपीएल सामन्यांसाठी विचार करण्यात यावा, यासाठी बीसीसीआयवर दबाव वाढत आहे. सनरायझर्स हैदराबाद, राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्स या तीनही फ्रँचायझींनी बीसीसीआयला पत्र पाठवून दबाव वाढवला आहे. पंजाब किंग्सचे सह-मालक नेस वाडिया यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ''मी बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांशी याआधीही बोललो आहो आणि चंडीगढ येथे सामने खेळवावेत अशी विनंती केली आहे,''असे वाडिया यांनी सांगितले.  टीम इंडिया जागतिक कसोटीच्या अंतिम सामन्यात खेळल्यास BCCIला घ्यावा लागेल मोठा निर्णय

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: IPL 2021 to start on April 9, final on May 30 subject to GC approval

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.