IPL 2021 RR vs PK Live T20 Score : Chris Gayle becomes first player to hit 350 sixes in IPL, Ben Stokes has dropped KL Rahul | IPL 2021 : RR vs PK T20 Live : ख्रिस गेलच्या नावावर मोठा विक्रम, आयपीएलमध्ये हा विक्रम नोंदवणारा पहिलाच खेळाडू!

IPL 2021 : RR vs PK T20 Live : ख्रिस गेलच्या नावावर मोठा विक्रम, आयपीएलमध्ये हा विक्रम नोंदवणारा पहिलाच खेळाडू!

IPL 2021 : RR vs PK  T20 Live Score Update : राजस्थान रॉयल्सचे ( RR) प्रथमच नेतृत्व सांभाळणाऱ्या संजू सॅमसननं युवा ब्रिगेड मैदानावर उतरवण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्यानं चेतन सकारियाकडून पहिले षटक टाकून घेतले. त्यानं तिसऱ्या षटकात मयांक अग्रवालला बाद करून PBKS ला मोठा धक्का दिला. पण, त्यानंतर ख्रिस गेल व लोकेश राहुल यांनी अर्धशतकी भागीदारी करून पंजाबचा डाव सावरला. लोकेशला दिलेलं दोन जीवदान RRला महागात पडताना दिसत आहेत. राहुल टेवाटियानंही त्याच्याच गोलंदाजीवर गेलचा झेल सोडला. गेलनं या सामन्यात मोठा विक्रम केला आहे आणि आयपीएलमध्ये हा विक्रम करणारा तो पहिलाच फलंदाज ठरला.   IPL 2021 : RR vs PK T20 Live Score Update

पाच पदार्पणवीर...
लोकेश राहुलच्या ( KL Rahul) नेतृत्वाखालील पंजाब किंग्स ( Punjab Kings) व संजू सॅमसनच्या ( Sanju Samson ) नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals) यांच्यात आज सामना रंगत आहे. पंजाबनं आजच्या सामन्यात तीन करोडपती खेळाडूंना मैदानावर उतरवले आहे. आयपीएल २०२१च्या लिलावात पंजाब किंग्सनं या खेळाडूंवर सर्वाधिक बोली लावली होती आणि ते आज पदार्पण करत आहेत. राजस्थान रॉयल्सकडूनही दोन खेळाडू पदार्पण करत आहेत.  वडील टेम्पो चालक, तीन महिन्यांपूर्वी भावानं केली आत्महत्या अन् आज RR कडून पदार्पणात घेतली मोठी विकेट

  • पंजाब किंग्सकडून तीन खेळाडूंचे पदार्पण - शाहरूख खान, रिली मेरेडीथ आणि झाय रिचर्डसन
  • राजस्थान रॉयल्सकडून दोघांचे पदार्पण - मुस्ताफिजूर रहमान व शिवम दुबे  

लोकेश राहुलला दोन जीवदान RRला महागात पडणार
सौराष्ट्रच्या चेतन सकारीयानं राजस्थान रॉयल्ससाठी पहिलं षटक फेकलं. पदार्पण करणाऱ्या मुश्ताफिजूर रहमान यानं टाकलेल्या दुसऱ्याच षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर लोकेश राहुल ( KL Rahul) पायचीत असल्याची अपील झाली. DRS घेऊ की नको यासाठी थोडीचर्चा झाली, परंतु कर्णधार संजू सॅमसननं DRS घेतला नाही. त्यानंतर रिप्लेत लोकेश बाद असल्याचे दिसत होते आणि ही चूक राजस्थानला महागात पडू शकते. पण, चेतन सकारियानं ( Chetan Sakariya) तिसऱ्या षटकात पंजाबला धक्का दिला. त्यानं मयांक अग्रवालला ( १४) यष्टिरक्षक संजू सॅमसनकरवी झेलबाद केले. ७व्या षटकात बेन स्टोक्सनं लोकेश राहुलचा झेल सोडला.  IPL 2021 : RR vs PK T20 Live Score Update पाकिस्तानच्या नाकावर टिच्चून भारतात आला, शाहिद आफ्रिदीच्या टीकेचा सामना केला अन् आता मुंबई इंडियन्ससाठी धमाका करणार!

३५० षटकार मारणारा पहिला फलंदाज
ख्रिस गेलच्या नावावर सर्वाधिक ३५० षटकारांचा विक्रम आहे. त्यानंतर एबी डिव्हिलियर्स ( २३७), महेंद्रसिंग धोनी ( २१६), रोहित शर्मा ( २१४), विराट कोहली ( २०१) यांचा क्रमांक येतो. ipl 2021 t20 RR vs PK live match score updates Mumbai

जलद शतक - आयपीएलमध्ये सर्वात वेगवान शतक मारण्याचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे. त्यानं ३० चेंडूंत हे शतक पूर्ण करताना पुणे वॉरियर्स इंडिया संघाविरुद्ध १७ षटकार व १३ चौकार ठोकून १७५ धावा चोपल्या होत्या. त्यानंतर युसूफ पठाण ( ३७ चेंडू), डेव्हिड मिलर ( ३८ चेंडू), अॅडम गिलख्रिस्ट ( ४२ चेंडू) व एबी डिव्हिलियर्स ( ४३ चेंडू) यांचा क्रमांक येतो.  IPL 2021 latest news, RR vs PK IPL Matches

७ वर्ष झालं ख्रिस गेलचा विक्रम अबाधित - आयपीएलमध्ये सर्वोत्तम वैयक्तिक खेळीचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे. त्यानं २०१३मध्ये पुणे वॉरियर्स संघाविरुद्ध नाबाद १७५ धावांची वादळी खेळी केली होती. आयपीएल इतिहासातिल ही सर्वोत्तम वैयक्तिक खेळी आहे. त्यानंतर ब्रेंडन मॅक्यूलम ( १५८* वि. RCB, २००८), एबी डिव्हिलियर्स ( १३३* वि. MI, २०१५), लोकेश राहुल ( १३२* वि. RCB, २०२०) आणि एबी डिव्हिलियर्स ( १२९* वि. GL, २०१६) यांचा क्रमांक येतो. RR vs PK, RR vs PK live score, IPL 2021 RCB की MI?, सिडनी वन डे सामन्यातील Viral Couple पुन्हा चर्चेत; जाणून घ्या कारण

एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रमही ख्रिस गेलच्या नावावर आहे. त्यानं २०१३मध्ये पुणे वॉरियर्सविरुद्ध १७ षटकार खेचले होते. या विक्रमात टॉप टेनमध्ये फक्त एकच भारतीय फलंदाज आहे. ब्रेंडन मॅक्यूलम ( १३ वि. RCB), ख्रिस गेल ( १३ वि. DC), एबी डिव्हिलियर्स ( १२ वि. GL), ख्रिस गेल ( १२ वि. PBKS), आंद्रे रसेल ( ११ वि. CSK), सनथ जयसूर्या ( ११ वि. CSK), मुरली विजय ( ११ वि. RR), ख्रिस गेल ( ११ वि. SRH) आणि किरॉन पोलार्ड ( १० वि. PBKS) हे टॉप टेन फलंदाज आहेत.IPL 2021 RR vs PK, RR vs PK Live Match

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: IPL 2021 RR vs PK Live T20 Score : Chris Gayle becomes first player to hit 350 sixes in IPL, Ben Stokes has dropped KL Rahul

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.