IPL 2021: 'सूर्या बिनधास्तपणे भिडतो अन् पुरुन उरतो'; कॅप्टन रोहितकडून स्तुतिसुमनं

मुंबई इंडियन्सने मंगळवारी आपण पाच जेतेपद पटकावण्यात कसे यशस्वी झालो, हे पुन्हा एकदा सिद्ध करताना कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धचा गमावलेला सामना जिंकला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2021 03:26 PM2021-04-14T15:26:15+5:302021-04-14T15:26:47+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021 mumbai indians captain rohit sharma paises suryakumar yadav | IPL 2021: 'सूर्या बिनधास्तपणे भिडतो अन् पुरुन उरतो'; कॅप्टन रोहितकडून स्तुतिसुमनं

IPL 2021: 'सूर्या बिनधास्तपणे भिडतो अन् पुरुन उरतो'; कॅप्टन रोहितकडून स्तुतिसुमनं

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई इंडियन्सने मंगळवारी आपण पाच जेतेपद पटकावण्यात कसे यशस्वी झालो, हे पुन्हा एकदा सिद्ध करताना कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धचा गमावलेला सामना जिंकला. सांघिक खेळाचे प्रदर्शन करताना मुंबईने आपला संघ कोणा एका खेळाडूवर अवलंबून नसल्याचे दाखवून दिले. या दमदार विजयानंतर कर्णधार रोहित शर्माने गोलंदाजांच्या कामगिरीचे कौतुक करतानाच सलग दुसऱ्या सामन्यात आक्रमक खेळी केलेल्या फलंदाज सूर्यकुमार यादवचेही कौतुक केले. (IPL 2021 mumbai indians captain rohit sharma paises suryakumar yadav)

शाहरुखनं व्यक्त केलेल्या संतापावर आंद्रे रसेलनंही दिली प्रतिक्रिया, म्हणाला...

१५२ धावांत संपूर्ण संघ बाद झाल्यानंतरही कोलकाताला १० धावांनी नमवल्यानंतर रोहित शर्माने गोलंदाजांना विजयाचे श्रेय दिले. रोहित म्हणाला, ‘कोलकाताने फलंदाजीला शानदार सुरुवात करत दबाव निर्माण केला होता, मात्र त्या परिस्थितीतूनही केलेले पुनरागमन पाहता हा शानदार विजय ठरला. प्रत्येक गोलंदाज संघाच्या विजयात योगदान देण्यास उत्सुक होता. या सामन्यातून नक्कीच आत्मविश्वास उंचावेल, तसेच अनेक सकारात्मक गोष्टी आता घडतील.’

चाहरच्या चार विकेट रसेलच्या पाच विकेटला का भारी पडल्या? समजून घ्या सामन्याचं गणित...

रोहितने यावेळी सूर्यकुमारचे विशेष कौतुक केले. तो म्हणाला, ‘भारतीय संघाकडून ज्या फॉर्ममध्ये त्याने फलंदाजी केली, तोच फॉर्म सूर्याने मुंबईसाठी कायम राखला आहे. तो बिनधास्त होऊन खेळला, त्याने कोणतेही दडपण घेतले नाही. त्याचे मोठे आणि आक्रमक फटके पाहून तो धोका पत्करत असल्याचे जाणवतच नाही.’ त्याचवेळी, रोहितने फलंदाजांनी डेथ ओव्हर्समध्ये धावा काढायला पाहिजेत असेही सांगितले.

'कोहली ब्रिगेड'ला 'देव' पावला; कोरोनावर मात करून धडाकेबाज सलामीवीर संघात परतला!

गोलंदाजांना विजयाचे श्रेय देताना रोहित म्हणाला की, ‘कोलकाताने पहिल्या सहा षटकांमध्ये शानदार फलंदाजी केली. मात्र पॉवर प्लेनंतर राहुल चहरने चार मोलाचे बळी घेत मुंबईला पुनरागमन करुन दिले. कृणालनेही शानदार मारा केला. प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास मी सर्वच गोलंदाजांचे कौतुक करु शकतो.’
 

Web Title: IPL 2021 mumbai indians captain rohit sharma paises suryakumar yadav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.