IPL 2021 MI vs SRH Live T20 Score : Adam Milne is all set to make his MI debut, Rohit Sharma won toss, both team Playing XI  | IPL 2021, MI vs SRH T20 Live : मुंबई इंडियन्सनं ३.२ कोटींचा खेळाडू मैदानावर उतरवला, नाणेफेक जिंकून बनवला SRHला धुण्याचा प्लान

IPL 2021, MI vs SRH T20 Live : मुंबई इंडियन्सनं ३.२ कोटींचा खेळाडू मैदानावर उतरवला, नाणेफेक जिंकून बनवला SRHला धुण्याचा प्लान

IPL 2021 : MI vs SRH T20 Live Score Update : कोलकाता नाईट रायडर्स ( KKR) विरुद्ध चुरशीचा विजय मिळवल्यानंतर मुंबई इंडियन्सचा संघ ( MI) आज डेव्हिड वॉर्नरच्या सनरायझर्स हैदराबादला ( SRH) धक्का देण्यासाठी सज्ज झाला आहे. चेन्नईच्या एम ए चिदंबरम स्टेडियमवर हा सामना खेळवण्यात येणार आहे. आयपीएलच्या पहिल्या आठवड्यात सात संघांनी विजयाचे खाते उघडले आहे, पण, माजी विजेत्या सनरायझर्स हैदराबादला दोन्ही सामन्यांत हार मानावी लागली आहे. त्यामुळे पहिल्या विजयासाठी ते उत्सुक आहेत.IPL 2021 : MI vs SRH T20 Live Score Update

मुंबई इंडियन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. चेपॉकवर दोन सामने खेळल्यामुळे येथील खेळपट्टीचा चांगला अभ्यास आहे. मुंबई इंडियन्सनं आजच्या सामन्यात एक बदल केला असून अॅडम मिल्नेला अंतिम ११मध्ये संधी दिली आहे. आयपीएल लिलिवात मिल्नेसाठी MIनं ३.२ कोटी मोजले होते आणि तो आज पदार्पण करणार आहे. सनरायझर्सनं चार बदल केले आहेत.

मुंबई इंडियन्स अंतिम ११ खेळाडू ( Mumbai Indians playing XI) - रोहित शर्मा, क्विंटन डी कॉक, सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पांड्या, किरॉन पोलार्ड, कृणाल पांड्या, राहुल चहर, अॅडम मिल्ने, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह ( Match 9. Mumbai Indians XI: R Sharma, Q de Kock, S Yadav, I Kishan, H Pandya, K Pollard, K Pandya, A Milne, R Chahar, J Bumrah, T Boult)  

सनरायझर्स हैदाराबादचे ११ खेळाडू ( Sunrisers Hyderabad's playing XI) - डेव्हिड वॉर्नर, जॉनी बेअरस्टो, मनीष पांडे, विराट सिंग, अब्दुल समद, विजय शंकर, अभिषेक शर्मा, राशिद खान, भुवनेश्वर कुमार, मुजीब उर रहमान, खलील अहमद ( Match 9. Sunrisers Hyderabad XI: D Warner, J Bairstow, M Pandey, V Singh, A Samad, V Shankar, A Sharma, R Khan, B Kumar, M Ur Rahman, K Ahmed)

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: IPL 2021 MI vs SRH Live T20 Score : Adam Milne is all set to make his MI debut, Rohit Sharma won toss, both team Playing XI 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.