IPL 2021 : MI Vs PBKS T20 Live : पराभवानंतर रोहित शर्मानं टोचले फलंदाजांचे कान; म्हणाला, विचार करायला हवा!

IPL 2021 MI Vs PBKS Live T20 Score : मुंबई इंडियन्सला सलग दुसऱ्या सामन्यात पराभव पत्करावा लागला. पंजाब किंग्सनसं ( Punjab Kings) ९ विकेट्स राखून हा सामना जिंकला अन् गुणतक्त्यात पाचव्या क्रमांकावर झेप घेतली.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2021 11:57 PM2021-04-23T23:57:06+5:302021-04-23T23:57:31+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021 MI Vs PBKS Live T20 Score : Not enough runs, exactly. I still feel it's not a bad wicket to bat on, Rohit Sharma | IPL 2021 : MI Vs PBKS T20 Live : पराभवानंतर रोहित शर्मानं टोचले फलंदाजांचे कान; म्हणाला, विचार करायला हवा!

IPL 2021 : MI Vs PBKS T20 Live : पराभवानंतर रोहित शर्मानं टोचले फलंदाजांचे कान; म्हणाला, विचार करायला हवा!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2021 MI Vs PBKS Live T20 Score : मुंबई इंडियन्सला सलग दुसऱ्या सामन्यात पराभव पत्करावा लागला. पंजाब किंग्सनसं ( Punjab Kings) ९ विकेट्स राखून हा सामना जिंकला अन् गुणतक्त्यात पाचव्या क्रमांकावर झेप घेतली. मुंबई इंडियन्सनं ६ बाद १३१ धावाच केल्या आणि पंजाबनं १७.४ षटकांत १ विकेटच्या मोबदल्यात हे लक्ष्य पार केले. पंजाब किंग्सनं १७.४ षटकांत १ बाद १३२ धावा करून विजय मिळवला. लोकेश राहुल ५२ चेंडूंत ३ चौकार व ३ षटकारांसह ६० धावांवर, तर गेल ३५ चेंडूत ५ चौकार व २ षटकारांसह ४३ धावांवर नाबाद राहिला.  MI Vs PBKS, MI Vs PBKS live score  मुंबई इंडियन्सच्या पराभवाला पांड्या बंधूसह अन्य फलंदाज ठरतायेत कारणीभूत!

प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सचा ( Mumbai Indians) सलामीवीर क्विंटन डी कॉक पुन्हा एकदा अपयशी ठरला. इशान किशनची बॅट यंदा रुसलेली दिसतेय. रोहित शर्मा ( ६३ ) आणि सूर्यकुमार यादव ( ३३) यांनी तिसऱ्या विकेटसाठी ५६ चेंडूंत ७९ धावांची भागीदारी केली. इशान किशन, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या यांनि निराश केले. किरॉन पोलार्ड १६ धावांचे योगदान दिले. मुंबईला २० षटकांत ६ बाद १३१ धावांवर समाधान मानावे लागले. मोहम्मद शमी व रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. MI Vs PBKS Live Score, IPL 2021 MI Vs PBKS, MI Vs PBKS Live Match  रोहित शर्मा पहिल्याच षटकात भडकला, २००व्या डावात नको ते करून बसला,Video  

प्रत्युत्तरात पंजाब किंग्सला लोकेश राहुल व मयांक अग्रवाल यांनी दमदार सुरूवात करून दिली. पहिल्या पॉवरप्लेमध्ये या दोघांनी ४६ धावा जोडल्या. लोकेशनं त्यानंतर ख्रिस गेलसह पंजाबचा डाव सावरला. क्षेत्ररक्षणातल्या चुकाही मुंबई इंडियन्सला महागात पडल्या. जसप्रीत बुमराह व राहुल चहर यांनी हातचा चौकार दिला. १८ चेंडूंत १७ धावांची गरज असताना गेलनं १८व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर खणखणीत षटकार खेचून ट्रेंट बोल्टचे स्वागत केले. त्यांतनंतर लोकेशनं ६,४ मारून विजयावर शिक्कामोर्तब केले. IPL 2021 latest news, MI Vs PBKS IPL Matches, MI Vs PBKS IPL match 2021, MI Vs PBKS T20 Match,  मुंबई इंडियन्सच्या किरॉन पोलार्डवर चाहते भडकले; रडीचा डाव खेळण्याने खडेबोल सुनावले!

या सामन्यानंतर रोहित शर्मा काय म्हणाला?
''पुरेशी धावसंख्या उभारू शकलो नाही, हेच सत्य आहे. फलंदाजीसाठी ही खेळपट्टी खराब अजिबात नव्हती. पंजाब किंग्सच्या फलंदाजांनी खेळ करून ते सिद्ध केले. आम्ही १५०-१६० धावा उभ्या करू शकलो असतो तर सामन्याचा निकाल वेगळा असता. मागील दोन सामन्यांत आम्हाला अपयश येत आहे, या समस्येवर लक्ष घालायला हवं,''असे रोहित म्हणाला.

''त्यांच्या गोलंदाजांनी पॉवर प्लेमध्ये उत्तम कामगिरी केली. इशान मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करत होता, परंतु तो अपयशी ठरला. मलाही अपयश आले. मागील चार सामन्यांत आम्ही पॉवर प्लेमध्ये चांगली फलंदाजी केली, परंतु आज ते जमले नाही. मधल्या फळीत चांगला खेळ व्हायला हवा,'' असेही रोहितनं स्पष्ट केलं. IPL 2021 latest news, MI Vs PBKS IPL Matches

Web Title: IPL 2021 MI Vs PBKS Live T20 Score : Not enough runs, exactly. I still feel it's not a bad wicket to bat on, Rohit Sharma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.