IPL 2021 : KKR vs SRH  T20 Live Score Update : नितीश राणा व राहुल त्रिपाठी यांच्या फटकेबाजीला SRHच्या मनीष पांडे व जॉनी बेअरस्टो यांच्याकडून तोडीसतोड उत्तर दिले. सनरायझर्स हैदराबादचे ( SRH) सलामीवीर १० धावांवर माघारी परतल्यानंतर कोलकाता नाईट रायडर्स ( KKR) हा सामना सहज जिंकेल असे वाटले होते. पण, मनीष-जॉनी जोडीनं दमदार खेळ केला. मनीषनं अखेरच्या षटकापर्यंत सामन्यातील चुरस कायम राखली. पॅट कमिन्सन टाकलेल्या १९व्या षटकात मनीष व अब्दुल समद यांनी १६ धावा चोपल्या. ६ चेंडूंत २२ धावांची गरज असताना आंद्रे रसेलनं सुरेख कामगिरी केली व KKR चा विजय पक्का केला. IPL 2021 : KKR vs SRH T20 Live Score Update नितीश राणानं अर्धशतकाचं सेलिब्रेशन केलं खास स्टाईलमध्ये, त्यामागे आहे विशेष कारण!

सलामीवीर माघारी परतल्यानंतर मनीष पांडे-जॉनी बेअरस्टोनं डाव सावरला
डेव्हिड वॉर्नर आणि वृद्धीमान सहा हे SRH चे सलामीवीर अवघ्या १० धावांवर माघारी परतले. नुकताच टीम इंडियाकडून पदार्पण करणाऱ्या  प्रसिद्ध कृष्णानं SRHचा कर्णधार वॉर्नरला बाद केले आणि त्यानंतर शाकिब अल हसननं दुसरा धक्का दिला. ६९९ दिवसांनी आयपीएलमध्ये पहिला सामना खेळणाऱ्या हरभजन सिंगच्या गोलंदाजीवर वॉर्नर बाद झाला असता, परंतु पॅट कमिन्सकडून झेल सुटला. तो सुटलेला झेल KKRला महागात पडला नाही. त्यानंतर मनीष पांडे व जॉनी बेअरस्टो यांनी अर्धशतकी भागीदारी करून हैदराबादचा डाव सावरला. बेअरस्टोनं ३२ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं. बेअरस्टोनं ४० चेंडूंत ५ चौकार व ३ षटकारासह ५५ धावा केल्या. पॅट कमिन्सनं त्याला बाद करून मनीष पांडेसोबतची ९२ ( ६७ चेंडू) धावांची भागीदारी संपुष्टात आणली. KKR vs SRH T20 Match, KKR vs SRH Live Score, IPL 2021 KKR vs SRH, KKR vs SRH Live Match

प्रसिद्ध कृष्णानं १६व्या षटकात मोहम्मद नबी ( १४) ला बाद करून SRH समोरील अडचणी वाढवल्या. मनीषनं ३७ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं. आयपीएलमधील त्याचे हे १९वे अर्धशतक ठरले. कृष्णानं ३५ धावांत २ विकेट्स घेतल्या. अब्दुल समदनं ८ चेंडूंत नाबाद १९ धावा केल्या. मनीष ४४ चेंडूंत २ चौकार व ३ षटकारांसह ६१ धावांवर नाबाद राहिला, पंरतु तो विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला. हैदराबादनं ५ बाद १७७ धावा केल्या आणि कोलकातानं १० धावांनी विजय मिळवला. कोलकाताचा हा आयपीएलमधील १००वा विजय ठरला.  तीन सुपर डूपर कॅच अन् SRHनं सामना फिरवला, Manish Pandeyची कॅच पाहून मालकिणबाई खूश झाल्या, Video 

नितीश राणा, राहुल त्रिपाठी चमकले, परंतु दिग्गजांची शरणागती
कोलकाता नाईट रायडर्स ( Kolkata Knight Riders) संघाच्या यंग ब्रिगेडसमोर सनरायझर्स हैदराबादच्या ( Sunrisers Hyderabad) गोलंदाजांची धुलाई केली. शुबमन गिल व नितीश राणा ( Nitish Rana) यांनी दमदार सुरूवात करून दिली. त्यानंतर राहुल त्रिपाठीनं ( Rahul Tripathi) हात धुऊन घेतले. नितीश व राहुलनं अर्धशतकी खेळी करताना SRHच्या गोलंदाजांना हतबल केलं. राहुलनं ५३ धावा चोपल्या. नितीशला शतकानं हुलकावणी दिली. नितीशनं ५६ चेंडूंत ९ चौकार व ४ षटकारांसह ८० धावा चोपल्या. हे दोघंही माघारी परतल्यानंतर SRHच्या गोलंदाजांनी कमबॅक केले. पण, दिनेश कार्तिकनं मॅच फिनिशर इनिंग खेळताना ९ चेंडूंत २२ धावा चोपल्या.   IPL 2021 latest news, KKR vs SRH IPL Matches अम्पायरनं बाद देऊ नये म्हणून Nitish Rana नं दाखवली बॅट, जाणून घ्या नेमकं काय झालं

KKR नं नितीश राणा व शुबमन गिल या जोडीनं ५३ धावांची सलामी दिली. राहुल त्रिपाठीने २९ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह ५३ धावा केल्या. नितीश व राहुल यांची ५० चेंडूंत ९० धावांची भागीदारी टी नटराजननं तोडली. त्यानंतर SRHच्या गोलंदाजांनी सामन्यात कमबॅक केले. मोहम्मद नबीनं सलग दोन चेंडूंत दोन विकेट्स घेत नितीश व इयॉन मॉर्गन यांना माघारी पाठवले. आंद्रे रसेलही मोठी खेळी करू शकला नाही. सनरायझर्स हैदराबादच्या गोलंदाजांचं जबरदस्त कमबॅक, अखेरच्या पाच षटकांत ४२ धावांत घेतल्या पाच विकेट्स घेतल्या.   KKR vs SRH Live Score, IPL 2021 KKR vs SRH पृथ्वी शॉच्या फलंदाजीवर अभिनेत्री फिदा; दिल्लीच्या फलंदाजाला दिलं 'हृदय'!The last time SunRisers Hyderabad faced Kolkata Knight Riders, we witnessed a Super Over-thriller. 👌👌

What will be in...

Posted by IPL - Indian Premier League on Sunday, April 11, 2021

 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: IPL 2021, KKR vs SRH T20 Live : 100th win for KKR in IPL history, beat SRH by 11 runs 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.