IPL 2021, Prithvi Shaw : पृथ्वी शॉच्या फलंदाजीवर अभिनेत्री फिदा; दिल्लीच्या फलंदाजाला दिलं 'हृदय'!

IPL 2021 : विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत एका पर्वात ८००+ ( ८२७) धावा करणाऱ्या पहिल्या फलंदाजाचा मान पटकावणाऱ्या पृथ्वी शॉ ( Prithvi Shaw) यानं आयपीएल २०२१तही फॉर्म कायम राखला.

IPL 2021 : विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत एका पर्वात ८००+ ( ८२७) धावा करणाऱ्या पहिल्या फलंदाजाचा मान पटकावणाऱ्या पृथ्वी शॉ ( Prithvi Shaw) यानं आयपीएल २०२१तही फॉर्म कायम राखला.

दिल्ली कॅपिटल्स संघाचे ( Delhi Capitals) प्रतिनिधित्व करताना पृथ्वीनं चेन्नई सुपर किंग्सच्या ( Chennai Super Kings) गोलंदाजांची धुलाई केली. त्यानं ३८ चेंडूंत ९ चौकार व ३ षटकारांच्या मदतीनं ७२ धावा चोपल्या आणि शिखर धवनसह पहिल्या विकेटसाठी १३८ धावांची विक्रमी भागीदारी केली.

१८८ धावांचा पाठलाग करताना या दोघांनी पहिल्या विकेटसाठी १३८ धावांची भागीदारी करताना दिल्ली कॅपिटल्सच्या ( Delhi Capitals) विजयाचा मजबूत पाया रचला. दिल्लीनं ७ विकेट्स राखून हा सामना जिंकला.

दिल्ली कॅपिटल्ससाठी पहिल्या विकेटसाठी ही तिसरी सर्वोत्तम भागीदारी ठरली. माहेला जयवर्धने/वीरेंद्र सेहवाग - १५१ वि. मुंबई इंडियन्स, २०१३, डेव्हिड वॉर्नर/वीरेंद्र सेहवाग - १४६ वि. पंजाब किंग्स, २०११ हे आघाडीवर आहेत.

पृथ्वी शॉच्या या कामगिरीचे सर्वांनी कौतुक केलं. वीरेंद्र सेहवाग, आकाश चोप्रा पासून सर्वांनी सोशल मीडियावर पृथ्वी शॉच्या खेळीचे कौतुक केले. पण, यात लक्षवेधी प्रतिक्रिया ठरली ती अभिनेत्री प्राची सिंग ( Prachi Singh) हिची. तिनं पृथ्वीचा फोटो इंस्टास्टोरीवर पोस्ट करून त्यावर 'हृदयाचा' सिम्बॉल लावला आहे.

पृथ्वीच्या पोस्टवर प्राची सातत्यानं लाईक्स अन् कमेंट्स करत आहे. इतकेच नाही, तर पृथ्वीही तिच्या कमेंट्सवर प्रतिक्रिया देताना पाहायला मिळत आहे. प्राची अन् पृथ्वीच्या या गप्पा-टप्पांवरून नेटिझन्सनी त्यांच्या प्रेमप्रकरणाच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

प्राची सिंह हिनं Colors TVवरील उडान या कार्यक्रमात काम केलं होतं.